Maharashtra Elections 2024 : काँग्रेसच्या रणनीतीमध्ये आक्रमक ठाकरे गट अडकला? लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections 2024 : जागा वाटपात आक्रमक असणाऱ्या ठाकरे गटाला वेसण घालण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई : महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपावर वाद सुरू असल्याची चर्चा आहे. शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसच्या जागांवर दावा केल्याची चर्चा आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसनेही शिवसेना ठाकरे गटावर ताठर भूमिका घेतली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, जागा वाटपात आक्रमक असणाऱ्या ठाकरे गटाला वेसण घालण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे.
नाना पटोले विरुद्ध संजय राऊत...
महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू करण्यात आली. जागा वाटपाच्या चर्चेत ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आपल्या पक्षांची सूत्रे होती. नाना पटोले यांनी आक्रमकपणे काँग्रेसची बाजू मांडली. नाना पटोले हे आक्रमक नेते समजले जातात. काही वृत्तांनुसार, जागा वाटपाच्या बैठकीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात खटके उडाले असल्याचे दिसून आले. नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे मविआमध्ये फूट पडणार का, याची चर्चा सुरू झाली होती.
advertisement
महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी हे वृत्त फेटाळून लावले.
बाळासाहेब थोरात समन्वयक...
नाना पटोले यांच्या आक्रमकतेबाबतच्या तक्रारी ठाकरे गटाने काँग्रेस हायकमांड आणि शरद पवार यांच्याकडे केल्याचे वृत्त होते. त्यानंतर आता काँग्रेसने जागा वाटपाची चर्चा आणि ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेससोबत समन्वय साधण्याची जबाबदारी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
advertisement
ही रणनीती का?
ठाकरे गटाच्या आक्रमकतेला वेसण घालण्यासाठी काँग्रेसने ही दुहेरी रणनीती आखली असल्याचे म्हटले जात आहे. या माध्यमातून जागा वाटपाच्या चर्चेत काँग्रेस प्रभाव कमी न करण्यावर भर देण्याचा प्रयत्न आहे. यातून काँग्रेस अधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या माध्यमातून महाविकास आघाडी आघाडीमध्ये अधिक जागा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
advertisement
इतर संबंधित बातमी :
view comments
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 22, 2024 11:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections 2024 : काँग्रेसच्या रणनीतीमध्ये आक्रमक ठाकरे गट अडकला? लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न!











