Maharashtra Elections Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी शड्डू ठोकला,ध्रुव राठीचं चॅलेंज स्वीकारलं, ट्वीट करून म्हटलं...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections Aaditya Thackeray : प्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी एक आव्हान स्वीकारले आहे. यु्ट्युबर ध्रुव राठी याने एका व्हिडीओच्या माध्यमातून दिलेले आव्हान आपण स्वीकारत असल्याचे आदित्य यांनी म्हटले.
मुंबई : राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आव्हान-प्रतिआव्हान दिले जात आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी एक आव्हान स्वीकारले आहे. यु्ट्युबर ध्रुव राठी याने एका व्हिडीओच्या माध्यमातून दिलेले आव्हान आपण स्वीकारत असल्याचे आदित्य यांनी म्हटले. आदित्य ठाकरे यांनी 'मिशन स्वराज्य' म्हणत लोकांच्या मुद्यांवर चर्चा करण्याचे आणि काम करण्याचे आव्हान स्वीकारत असल्याचे म्हटले.
युट्युबर ध्रुव राठी याने महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ जारी केला आहे. मिशन स्वराज या नावाने ध्रुव राठीने व्हिडीओ जारी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याचे स्वप्न पाहिले, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने आव्हान केले. छत्रपती शिवरायांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेती, हवामान, रोजगार, शिक्षण,आरोग्याच्या मुद्यावर त्याने आव्हान केले. हे सगळं करण्यासाठी राजकीय इच्छा शक्तीची आवश्यकता असते आणि हे करण्यासाठी जनता राजकीय पक्षांना या मुद्यांवर निवडणूक लढण्यास बाध्य करतील आणि मतदान करतील. या मुद्यांवर मतदान झाल्यानंतर या मुद्यांवर काम होणार असल्याचे ध्रुव राठीने सांगितले.
advertisement
आदित्यने आव्हान स्वीकारले...
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले, मिशन स्वराज्यनुसार महाविकास आघाडी म्हणून नेमक्या ह्याच उद्दिष्टांच्या दिशेने आम्ही काम करत होतो, जो आत्ताच्या सत्ताधार्यांनी कपटाने थांबवला. हे आव्हान आम्ही स्वीकारतोच आहोत, कारण ते फक्त स्वीकारण्याजोग आव्हान आहे म्हणून नाही तर आम्हाला हीच चर्चा हवी होती म्हणून, कारण जे आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं आहे, गरजेचं आहे, त्यावर चर्चा व्हायलाच हवी असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
advertisement
मिशन स्वराज्य:
मविआ म्हणून नेमक्या ह्याच उद्दिष्टांच्या दिशेने आम्ही काम करत होतो, जो आत्ताच्या सत्ताधार्यांनी कपटाने थांबवला.
हे आव्हान आम्ही स्वीकारतोच आहोत, कारण ते फक्त स्वीकारण्याजोग आव्हान आहे म्हणून नाही तर आम्हाला हीच चर्चा हवी होती म्हणून, कारण जे आपल्या… pic.twitter.com/GevIaNarGZ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 15, 2024
advertisement
युट्युबर ध्रुव राठी याचे लोकसभा निवडणुकाच्या काळातील राजकीय मुद्यांवरील व्हिडीओ चांगलेच चर्चेत आले होते. ध्रुव राठीवर त्याच्या व्हिडिओमुळे अनेकांनी टीका केली होती. आता, आपलं नवीन आव्हान स्वीकारल्यास आपण त्या राजकीय पक्षांला सशर्त पाठिंबा देणार असून तो पक्ष सत्तेवर आल्यास त्यांना या मुद्याचा जाब विचारला जाईल असेही ध्रुव राठीने म्हटले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2024 11:29 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी शड्डू ठोकला,ध्रुव राठीचं चॅलेंज स्वीकारलं, ट्वीट करून म्हटलं...


