Maharashtra Elections : महायुतीतील वादाचा भाजपला धक्का, शिवसेनेवर तोफ डागत माजी खासदाराचे बंडाचे निशाण
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections Heena Gavit: महायुतीतील वादाचा फटका भाजपला बसला आहे. शिवसेनेवर तोफ डागत माजी खासदाराचे बंडाचे निशाण फडकावले आहे.
नंदुरबार: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हिना गावित यांनी शिवसेना शिंदे गटावर आरोपांची तोफ डागत आपली अपक्ष उमेदवारी कायम असल्याचे सांगितले. हिना गावित या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुआ या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या कालावधीत गावित यांनी अर्ज मागे घेतला नव्हता. त्यामुळे भाजप काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, आज हिना गावित यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले.
हिना गावित या नंदुरबारच्या माजी खासदार आहेत. हिना गावित यांनी म्हटले की, शिवसेनेने भाजपचा फायदा घेतला आहे. नंदुरबारमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ गावित आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात शिवसेनेचे नंदुरबारमधील लोक काम करत आहेत. त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला आहे. वरिष्ठांच्या कानावर हा सगळा प्रकार घातला होता. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. वरिष्ठ पातळीवरून कोणतीही कारवाई न झाल्याने आपण अक्कलकुआमधून माघार घेत असल्याचे सांगितले.
advertisement
गावित यांनी म्हटले की, शिवसेना शिंदे गटाने भाजपचा फायदा घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत शिेंदे गटाने महायुतीचा धर्म पाळला नाही. आताही युतीचा धर्म पाळला जात नाही. त्यामुळे आता मी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे हिना गावित यांनी सांगितले.
हिना गावित यांचा राजीनामा हा शिवसेना शिंदे गट आणि भाजपा मधील वादाची परिणीती असल्याचे म्हटले जाते. पक्षाच्या वरिष्ठांकडून होत असलेल्या सोईस्कर दुर्लक्षाचा महायुतीला मोठा फटक पडण्याची शक्यता आहे.
advertisement
इतर महत्त्वाची बातमी :
view comments
Location :
Nandurbar,Maharashtra
First Published :
Nov 05, 2024 11:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : महायुतीतील वादाचा भाजपला धक्का, शिवसेनेवर तोफ डागत माजी खासदाराचे बंडाचे निशाण











