माजलगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक : मुंडे बहीण-भावाचे फोटो बंडखोराच्या प्रचारात, अदृश्य शक्तीने अजितदादांच्या आमदाराला घेरलं
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections : बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघातील भाजप बंडखोर उमेदवार फुलचंद मुंडे यांनी या महायुतीच्या नेत्यांचे फोटो वापरले आहेत. बंडखोराच्या प्रचारात मुंडे भावा बहिणीचे फोटो झळकल्याने जिल्ह्यात सध्या चर्चांना उधाण आले आहे.
सुरेश जाधव, बीड : राज्यात यंदाची विधानसभा निवडणूक ही चुरशीची होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक जागांवर थेट लढत होणार आहे. निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने काही जागांवर बंडखोरी झाली आहे. सध्या बीडमध्ये एका बंडखोराचा प्रचार सध्या चर्चेत आहे. भाजप आमदार पंकजा मुंडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा फोटो लावून बंडखोरांने प्रचार सुरू केला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघातील भाजप बंडखोर उमेदवार फुलचंद मुंडे यांनी या महायुतीच्या नेत्यांचे फोटो वापरले आहेत. बंडखोराच्या प्रचारात मुंडे भावा बहिणीचे फोटो झळकल्याने जिल्ह्यात सध्या चर्चांना उधाण आले आहे.
अजितदादांचा उमेदवार अडचणीत...
निवडणुकीत दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाच्या मुद्यावर नाराजीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. माजलगावमध्येही महायुतीत बंडखोरी झाली आहे. या मतदारसंघात प्रकाश सोळंके हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादीमधील मातब्बर नेते आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये माजलगाव मतदार संघ पंकजा मुंडे यांना 900 मताने आघाडी देणारा ठरला होता. मात्र याच मतदारसंघात पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या फुलचंद मुंडे यांनी निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून मैदानात आहेत.
advertisement
पंकजांच्या पराभवाचा वचपा काढणार...
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचे बंडखोर अपक्ष उमेदवार फुलचंद मुंडे यांनी सांगितले. या निवडणुकीत पंकजा मुंडे देखील मला सहकार्य करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. माझ्या पाठीशी अदृश्य शक्ती आहे त्यामुळे विजय माझाच होणार तसेच लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या पराभवांचा वचपा काढला जाईल, असेही त्यांनी म्हटले. गोपीनाथरावजी मुंडे यांचा विचार आणि भाजप बीड जिल्ह्यातून संपून द्यायचा नसेल पंकजाताई यांचे हात बळकट करण्यासाठी माझ्या पाठीमागे आशीर्वाद उभा करा. सगळ्या प्रस्थापितांना जागा दाखवून देण्याचे काम करायचं आहे असे आवाहनही फुलचंद मुंडे यांनी केले. फुलचंद मुंडे यांच्या भूमिकेनंतर आता माजलगाव मतदार संघातील बंडखोर नेमका कुणाच्या पाठिंबावर असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2024 11:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माजलगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक : मुंडे बहीण-भावाचे फोटो बंडखोराच्या प्रचारात, अदृश्य शक्तीने अजितदादांच्या आमदाराला घेरलं


