Maratha Reservation Manoj Jarange Patil : मराठवाड्यात जरांगे इफेक्ट! धग कमी करण्यासाठी भाजपने आखली खास रणनीती

Last Updated:

Maharashtra Assembly Elections Manoj Jarange Maratha Reservation : जरांगे यांच्या नव्या भूमिकेनंतर भाजपने आपल्या व्यूहरचनेत बदल केला आहे. जरांगे पाटील इफेक्ट कमी करण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे.


जरांगे इफेक्ट कमी करण्यासाठी मराठवाड्यात भाजपची खास रणनीती
जरांगे इफेक्ट कमी करण्यासाठी मराठवाड्यात भाजपची खास रणनीती
सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर :  लोकसभेत दिसलेला जरांगे फॅक्टर विधानसभेतही दिसणार असल्याची चर्चा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची घोषणा केली होती. पण, त्यानंतर उमेदवार न उतरवण्याचा निर्णय जाहीर केला. त्याशिवाय, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पाडापाडी करण्याचे आवाहन समाजाला केले. जरांगे यांच्या नव्या भूमिकेनंतर भाजपने आपल्या व्यूहरचनेत बदल केला आहे. जरांगे पाटील इफेक्ट कमी करण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा प्रभाव मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर दिसून आला. अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक, विशेषत: महिला आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर अंतरवाली सराटी हे मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र झाले होते. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर फटका बसल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे.

भाजपची विशेष रणनीती

मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे भाजप ला फटका बसू शकतो याचा अंदाज आल्याने भाजपने विशेष रणनीती आखली आहे. केंद्रातून ठाण मांडून बसलेल्या खासदार भुपेंद्र यादव आणि शिवप्रसाद यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मराठवाडामध्ये बंडखोरीचा फटका किती बसणार यासाठीचे सर्वेक्षण केले आहे. त्यात बंडखोर भाजप आणि शिवसेनेला नुकसान करणार असा अंदाज आहे.
advertisement

नेत्यांवर सोपवली जबाबदारी...

भाजपने मराठवाड्यातील आठ मतदार संघांसाठी खास निरीक्षक नेमले आहे. यात दिग्गज नेत्यांवर जबाबदार सोपवली आहे. भोकरदन आणि बदनापूरसाठी रावसाहेब दानवे, देगलूरसाठी अशोक चव्हाण, केजसाठी प्रीतम मुंडे यांच्यासह 5 जणांची नेमणूक केली आहे. या नेत्यांवर जरांगे इफेक्ट कमी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नेत्यांना मतदारसंघात ठाण मांडण्याशिवाय, दररोजच्या प्रचाराची रणनीती आखण्याची सूचना केली आहे.
advertisement
एका बाजूला मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजात भाजपाविरोधात नाराजी आहे. त्यामुळे ही नाराजी कमी करण्यासाठी भाजपची रणनीती यशस्वी होईल का, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maratha Reservation Manoj Jarange Patil : मराठवाड्यात जरांगे इफेक्ट! धग कमी करण्यासाठी भाजपने आखली खास रणनीती
Next Article
advertisement
Dahanu Nagar Parishad Election Result : मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गुलाल उधळला?
मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु
  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

View All
advertisement