Maharashtra Elections : अजितदादांकडून 5 मुस्लिम उमेदवार, काँग्रेसचे किती? राज्यात अल्पसंख्याक प्रतिनिधीत्वात घट!

Last Updated:

Maharashtra Assembly Elections : निवडणुकीत मुस्लिम मतदारांभोवती चर्चा सुरू असताना दुसरीकडे मुस्लिम उमेदवारांबाबत काही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

अजितदादांकडून 5 मुस्लिम उमेदवार, काँग्रेसचे किती? राज्यात अल्पसंख्याक प्रतिनिधीत्वात घट!
अजितदादांकडून 5 मुस्लिम उमेदवार, काँग्रेसचे किती? राज्यात अल्पसंख्याक प्रतिनिधीत्वात घट!
मुंबई :  राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. निवडणुकीच्या प्रचारात रंग चढू लागला आहे. तर, दुसरीकडे काही महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. निव़डणुकीत मुस्लिम मतदारांभोवती चर्चा सुरू असताना दुसरीकडे मुस्लिम उमेदवारांबाबत काही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. राज्यात 288 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. मात्र, त्यातील 157 जागांवर एकही मुस्लिम उमेदवार नाहीत. राज्यातील एकूण उमेदवारांपैकी जवळपास 10 टक्के उमेदवार हे मुस्लिम समाजाचे असल्याचे समोर आले आहे.
'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यातील विधानसभा निवडणुकीत 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी फक्त 420 उमेदवार हे मुस्लिम आहेत. बहुसंख्य मु्स्लिम उमेदवार हे मुस्लिमबहुल भागातील आहेत. मालेगावमध्ये निवडणुकीच्या रिंगणात असलेले सर्व 13 उमेदवार मुस्लिम आहेत. औरंगाबाद पूर्वमधून एकूण 29 उमेदवारांपैकी 17 उमेदवार मुस्लिम आहेत. भिवंडी पश्चिममध्ये 11, मानखुर्द शिवाजीनगरमध्ये 13, नांदेड उत्तर, मुंबादेवी, मालाड पश्चिम या मतदारसंघात 9 मुस्लिम उमेदवार आहेत.
advertisement

राजकीय पक्षांमध्येही अनास्था?

राज्यात मुस्लिम उमेदवारांबाबत प्रमुख राजकीय पक्षांमध्ये अनास्था असल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात ओवैसी यांच्या एमआयएमने सर्वाधिक 16 उमेदवार मुस्लिम दिले आहेत. त्यानंतर काँग्रेसने 9 मुस्लीम उमेदवार उभे केले आहेत. तर भाजपाने एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 5 मुस्लिम उमेदवारांना संधी दिली. सर्वाधिक मुस्लिम उमेदवार हे अपक्ष असून 218 जण निवडणुकीच्या मैदानात आपलं नशीब आजमावत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : अजितदादांकडून 5 मुस्लिम उमेदवार, काँग्रेसचे किती? राज्यात अल्पसंख्याक प्रतिनिधीत्वात घट!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement