Maharashtra Elections Ajit Pawar : गटबाजी बघून माझी वाट लावू नका, अजितदादांनी ग्रामस्थांसमोर हात जोडले!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections Ajit Pawar : अजित पवार यांनी गाव भेट दौरा सुरू आहे. तर, दुसरीकडे त्यांच्याकडून ग्रामस्थांच्या भेटीचा कार्यक्रम सुरू आहे. यावेळी गटबाजीसमोर अजितदादांनी हात जोडले.
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी, पुणे : शरद पवारांसोबत फारकत घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याकडे खेचला. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळाले नाही. बारामतीच्या प्रतिष्ठेच्या लढतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांना पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर बारामती विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी अजित पवारांनी चांगलीच कंबर कसली आहे. अजित पवार यांनी गाव भेट दौरा सुरू आहे. तर, दुसरीकडे त्यांच्याकडून ग्रामस्थांच्या भेटीचा कार्यक्रम सुरू आहे. यावेळी गटबाजीसमोर अजितदादांनी हात जोडले. तुमच्या गावात वाद आहेत. तुमच्या गावातील वादाचा फटका मला बसू देऊ नका असेही अजित पवारांनी म्हटले.
वानेवाडी शेजारचं गाव असलेल्या वाघळवाडीमधील लोक देखील बोलवले आहेत असे कार्यकर्त्याने अजित पवारांना सांगितले. अजित पवारांनी वाघळवाडी मधल्या लोकांनी हातभार करावे असे म्हटले. त्यानंतर 5 ते 6 जणांनी हात केल्यावर अजित पवारांनी अरे बाबा किती लोक आहेत असा उपरोधिक टोला लगावला.
अजित पवारांनी म्हटले की, तुम्हाला सगळं काय मिळते. त्यामुळे माझी किंमत तुम्हाला राहिली नाही. तुम्ही लोकसभेला शरद पवार साहेबांचे ऐकले. साहेबांच्या वयाचा विचार करता तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम केला. आमच्या जयंत पाटलांच्या भाषेत बोलत झालं तर करेक्ट कार्यक्रम केला. आम्ही पण तो स्वीकारला. आपल्याच लोकांनी कार्यक्रम केला तर न स्वीकारून कोणाला सांगता? आमच्याच लोकांनी बटणे दाबली. बाहेरून तर कुणी आलं नव्हतं. आम्ही पण ते स्वीकारले असल्याचे अजित पवारांनी म्हटले.
advertisement
शेरेबाजीने माझी बदनामी...
अजितदादांनी म्हटले की, काम चांगली करा. जर काम खराब झालं तर मलिदा गँग म्हटलं जातं. या शेरेबाजीतून माझी बदनामी होत असल्याचे अजित पवारांनी सांगितले. माझ्याकडे बघून निवडणुकीत भाग घ्या असे म्हणताना तुमच्याकडे गटबाजी करू नका. गटबाजी बघून माझी वाट लावू नका असेही अजित पवारांनी म्हटले.
विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका...
advertisement
तुम्हाला 1500 रुपये दिले पण महागाई किती वाढवली असे विरोधक विचारतात. समोरच्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. ते तुम्हाला स्वप्न दाखवण्याचे काम करता आहेत. ते स्वप्न कधीही अस्तित्वात येऊ शकत नाही असेही त्यांनी म्हटले.
तुम्ही एक नंबरची मत दिली मी सगळ्यात जास्त निधी आणला. तुम्ही जेवढी मत द्याल तेवढा निधी आणेल. गावातली नाराजीचा फटका मला काय बसू देऊ नका एवढेच करा असे त्यांनी म्हटले. लोकसभेला जसं ताईला खुश करण्याकरता मतदान केलं साहेबांना खुश करण्याकरता मतदान केलं तसं मला खुश करायला मतदान करा असे आवाहन त्यांनी केले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 11, 2024 10:06 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Ajit Pawar : गटबाजी बघून माझी वाट लावू नका, अजितदादांनी ग्रामस्थांसमोर हात जोडले!


