Prakash Ambedkar : 'वंचित'मुळे मविआला 20 जागांवर फटका; मतांची टक्केवारीही मनसेपेक्षाही सरस

Last Updated:

Maharashtra Election Results Prakash Ambedkar : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने आपला मत टक्का कायम ठेवण्यास यश मिळवले आहे.

'वंचित'मुळे मविआला 20 जागांवर फटका; मतांची टक्केवारीही मनसेपेक्षाही सरस
'वंचित'मुळे मविआला 20 जागांवर फटका; मतांची टक्केवारीही मनसेपेक्षाही सरस
मुंबई :  राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड विजय मिळाला. तर, महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. विधानसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर काही ठिकाणी चालला. त्याच्या परिणामी महाविकास आघाडीला 20 जागांवर पराभव स्वीकारावा लागला. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या त्सुनामीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने आपला मत टक्का कायम ठेवण्यास यश मिळवले आहे. वंचितचा मतांचा वाटा हा मनसेपेक्षा अधिक आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 200 जागा लढवल्या आहेत. राज्यातील 194 मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांची अमानत रक्कम जप्त झाली. काही ठिकाणी वंचितच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली होती.

वंचितने कोणाच्या जागा पाडल्या?

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसला. दोन्ही आघाडींचा मतांचा आधार हा मागासवर्गीय, अल्पसंख्याक, ओबीसी घटक आहे. या मतांमध्ये विभागणी झाली. वंचितच्या उमेदवारांमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 8, काँग्रेस 6, शिवसेना ठाकरे 6 आणि एमआयएमच्या 2 उमेदवारांचा समावेश आहे.
advertisement
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप नाईक, सतीश चव्हाण, राजेश टोपे, राहुल मोटे, राजेंद्र शिंगणे, फहाद अहमद यांचा अगदी थोड्यात पराभव झाला. तर, काँग्रेसचे वसंत पुरके, दिलीप सानंद, धीरज देशमुख यांना नेत्यांनादेखील कमी मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

वंचितचे उमेदवार महायुतीच्या पथ्यावर

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड आणि तानाजी सावंत यांचा थोडक्यात मतांनी पराभव झाला. तर, दुसरीकडे अतुल सावे, मंदा म्हात्रे, प्रशांत बंब, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर, रमेश कराड या उमेदवारांचा कमी मतांनी विजय झाला. या मतदारसंघात वंचितने घेतलेली मते महायुतीच्या पथ्यावर पडली.
advertisement

वंचितची दखलपात्र कामगिरी

'वंचित'ला या विधानसभा निवडणुकीत एकूण 14 लाख 22 हजार मते मिळाली. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'वंचित'ला 15 लाख 82 हजार (3.6 टक्के) मते मिळाली होती. अल्पसंख्याकबहुल मतदारसंघात ‘वंचित’ने या वेळी मुस्लीम उमेदवार दिले. त्यामुळे इम्तियाज जलील आणि सिद्दीकी नसुरीद्दीन तकुद्दीन हे छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवार पडले. वंचितने मायवती यांच्या बहुजन समाज पक्षापेक्षा अधिक मते घेतली. मायावती यांच्या बसपाने 237 उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र, बसपाला फक्त 0.48 टक्के इतकी अत्यल्प मते मिळाली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Prakash Ambedkar : 'वंचित'मुळे मविआला 20 जागांवर फटका; मतांची टक्केवारीही मनसेपेक्षाही सरस
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement