Maharashtra Elections Amit Shah Rally : महायुती सरकारचे पुढील मुख्यमंत्री कोण? अमित शहांचे जाहीर सभेत संकेत
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Amit Shah in Maharashtra Elections : एकनाथ शिंदे कायम राहणार की मुख्यमंत्री बदलले जाणार, याची चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्ट संकेत दिले.
सांगली : विधानसभा निवडणुकीत अपेक्षित कामगिरी झाल्यास आगामी महायुतीच्या सरकारची सूत्रे कोणाच्या हाती असतील याची चर्चा सध्या सुरू आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम राहणार की मुख्यमंत्री बदलले जाणार, याची चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्ट संकेत दिले. महायुतीला विजयी करा, फडणवीसांना विजयी करा असे अमित शहा यांनी म्हटले. विशेष म्हणजे शहा यांची प्रचार सभा ही भाजप उमेदवारांसाठी होती. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
इचलकरंजी, शिरोळ व हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा प्रचार दौरा आजपासून सुरू झाला. शिराळा येथील सभेत बोलताना अमित शहा यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचाार सभेत विरोधी बाकावरील महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. आघाडीच्या सरकारने शिराळामध्ये बंद केलेली नागपूजा महायुतीचे सरकार सुरू करेल असे आश्वासनही त्यांनी दिले. बत्तीस शिराळाची नागपंचमी पारंपरिक आणि पहिल्यासारखीच होणार आणि कायद्याच्या पालन करत नागपंचमी सुरू होईल अशी घोषणा अमित शहा यांनी केली.
advertisement
अमित शहा यांनी म्हटले की, वसंतदादा पाटील , राजरामबापु पाटील यांनी सहकाराचे जाळे निर्माण केलं, त्यांना नमन करतो. डबल इंजिन सरकार मिळून महाराष्ट्र राज्य 1 नंबर बनवेल. औरंगाबादचे नाव संभाजीनगर झाले. पण महाविकास आघाडीवाले आणि महान बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे संभाजी नगरला विरोध करत आहेत. शरद पवार किती जोर लावायचा लावा, संभाजी नगर असे नाव होणारच असे अमित शहा यांनी म्हटले. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारकडून गावागावातील शेतकऱ्यांच्या जमीन वक्फ बोर्डाला दिल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आघाडी सरकार पुन्हा आल्यावर राज्यातील शेतकरयांच्या जमीन वक्फ बोर्डाला दिल्या जातील असेही अमित शहा यांनी म्हटले.
advertisement
शिराळा आणि सांगलीच्या विकासासाठी महायुतीचे सरकार आवश्यक आहे. एमआयडीसीापासून ते इतर अनेक प्रश्नांची सोडवणूक आम्ही करू. महायुतीला मतदान करा, फडणवीसांना विजयी करा असे आवाहन शहा यांनी केले. महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. अशातच फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
November 08, 2024 1:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Amit Shah Rally : महायुती सरकारचे पुढील मुख्यमंत्री कोण? अमित शहांचे जाहीर सभेत संकेत