Maharashtra Election Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी अखेर डाव टाकला, विद्यमान आमदारांच्या पोटात गोळा, गेम फिरणार?

Last Updated:

Manoj Jarange Patil : ज्या ठिकाणी उमेदवार पाडणार अशी घोषणा करण्यात आलीय, त्या ठिकाणचे आमदार आता डेंजर झोनमध्ये आल्याचे म्हटले जात आहे.

मनोज जरांगेंनी अखेर डाव टाकला, विद्यमान आमदारांच्या पोटात गोळा, गेम फिरणार?
मनोज जरांगेंनी अखेर डाव टाकला, विद्यमान आमदारांच्या पोटात गोळा, गेम फिरणार?
मुंबई : लढणार की पाडणार ? असा सवाल मराठा समाजासमोर ठेवणारे आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये उपस्थितांशी संवाद साधताना कोणत्या जागा लढवणार आणि कोणत्या जागा पाडणार याची घोषणा केली. जरांगे पाटील यांच्या घोषणेने राज्यातील सत्ता समीकरणावर परिणाम होणार आहे. त्याशिवाय, ज्या ठिकाणी उमेदवार पाडणार अशी घोषणा करण्यात आलीय, त्या ठिकाणचे आमदार आता डेंजर झोनमध्ये आल्याचे म्हटले जात आहे. या आमदारांना विजयासाठी नवी समीकरणे जुळवावी लागणार आहे.
आपल्या मराठा आरक्षण आंदोलकांचे उमेदवार जाहीर केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासोबत मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाच्या मतांची मोट बांधली आहे. त्यासाठी मागील काही दिवसांपासून त्यांच्या बैठका सुरू होत्या. फक्त एकाच समाजाच्या मतांवर विजय मिळवता येणार नसल्याचे जरांगे यांनी आधी म्हटले होते. त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
advertisement
मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार पाडणार असल्याचे जाहीर केल्याने आता विद्यमान आमदार गॅसवर आले आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतदानामुळे राजकीय गणिते बदलली. आणखी कोणत्या मतदारसंघातील उमेदवार पाडायचे, याची यादीदेखील जरांगे पाटील लवकरच जाहीर

या मतदारसंघात उमेदवार पाडणार, कोणते आमदार गॅसवर?

गंगापूर - या मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब हे विद्यमान आमदार आहेत.
advertisement
कन्नड - या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत हे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याविरोधात भाजप नेते रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव ही शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे.
कळमनुरी - हिंगोली जिल्ह्यातील या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे आमदार आहेत.
गंगाखेड - छत्रपती संभाजीनगरमधील या मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गु्ट्टे हे आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतविभागणीचा फायदा गुट्टे यांना झाला होता.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी अखेर डाव टाकला, विद्यमान आमदारांच्या पोटात गोळा, गेम फिरणार?
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement