Maharashtra Elections Ajit Pawar Sharad Pawar: शेवटची निवडणूक म्हणत मुलीनंतर थेट नातवाला उभं केलं, अजित पवारांचे काकांवर टीकास्त्र

Last Updated:

Maharashtra Elections Ajit Pawar : अजित पवारांनी बारामतीमधील ग्रामस्थांच्या भेटीगाठीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. लोणी भापकर येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना अजित पवारांनी काका, शरद पवारांवर टीकास्त्र सोडले.

अजित पवार विरुद्ध शरद पवार
अजित पवार विरुद्ध शरद पवार
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी, पुणे : राज्यातील विधानसभेच्या निवडणूक प्रचारात आता रंग भरू लागले आहे. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या होमग्राउंडवर चांगलीच कंबर कसली आहे. अजित पवारांनी बारामतीमधील ग्रामस्थांच्या भेटीगाठीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. लोणी भापकर येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना अजित पवारांनी काका, शरद पवारांवर टीकास्त्र सोडले. आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत सुप्रियासाठी मते मागितली. त्यानंतर आता पुन्हा शेवटची निवडणूक असल्याचे सांगत नातवाला उभं केलं. मी पण पुतण्या आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
अजित पवार यांनी गावभेट दौऱ्यात संवाद साधताना म्हटले की, शरद पवारांच्या वयाचा आदर करून सुप्रियाला निवडून दिले. शरद पवार साहेब म्हणाले मी निवृत्त होणार आहे. वयाने निर्णय घेणार असतील. पण, त्यांच्या पुढचे काम करू शकतं? मी भावनिक करीत नाही. पण शरद पवार 30 वर्ष राज्यात काम केल्यानंतर त्यांनी दिल्लीत काम केलं असल्याचे अजित पवारांनी म्हटले. मी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करीत नाही..माझी फुशारकी नाही तर काम बोलतं असेही अजित पवारांनी म्हटले.
advertisement

लेकीनंतर थेट नातूच आणला...

लोकसभेला पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे सुप्रिया कडून लक्ष द्या. आता पण सांगतात साहेबांची शेवटची निवडणूक आहे नातवाकडे लक्ष द्या. आता हे अवघडच आहे. मी पण पुतण्या आहे ना? मुलगी झाली की थेट नातूच समोर आणला, मी पण मुलासारखाच आहे ना? असा सवाल अजित पवारांनी केला.
advertisement
त्यांनी पुढे म्हटले की, लोकसभेला जो निर्णय घ्यायचा होता. तुम्ही घेतलात आताची निवडणूक माझ्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.काही प्रमुख नेते आहेत त्याच्यात माझे नाव आहे. नाव व्हायला वेळ लागतो असेही त्यांनी म्हटले.

 मलिदा गँग बोलून अपप्रचार

2004 पासून मला थोडं वरिष्ठ नेते म्हणालयला लागले. तेव्हापासून मी राज्याच्या राजकारणात लक्ष घालू लागलो. आपल्या तालुक्यातील मुले काम करीत असतील तर त्याला मलिदा गँग का म्हणता? असा विरोधकांना सवाल करताना आज विरोधात बोलायला काही नाही म्हणून ते काहीही मलिदा गॅंग बोलतात असल्याचे टीका अजित रपवारांनी केली.
advertisement
मी काम करीत असताना जातीचा आणि नात्या गोत्याचा विचार केला नाही. गावातले पुढारी नीट वागत नाही. त्याचा राग माझ्यावर निघतो असेही अजितदादांनी म्हटले. ही निवडणूक झाल्यावर काही नवीन चेहऱ्याना मी पुढे आणेल. तुम्ही मला थेट खासदार केलं नाही. त्याआधी मी काम करत होतो. शरद पवार मुख्यमंत्री झाल्यावर मी तालुक्याला कसा फायदा होईल ते बघितले.
advertisement

अजित पवारांचा टोला

1989 मध्ये शरद पवार म्हणत होते की, मी अजितला तिकीट देणार नाही. पण मला 1991 ला मला तिकीट दिले. आता काही लोक काळ काम सुरू केलं नाही की त्यांना आमदारकीची स्वप्न पडायला लागली, असा टोलाही त्यांनी लगावला.
मला इंग्लिश येऊ नाहीतर येऊ नये परंतु मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. मी साडे साडेसहा लाख कोटींचा बजेट सादर करतो. साडेसहा लाख कोटी मधला त्याला टिंब काढून दाखव म्हणावं. तो माझा पुतण्या आहे. मी त्याच्यावर टीका नको करायला, असेही अजित पवारांनी टोला लगावला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Ajit Pawar Sharad Pawar: शेवटची निवडणूक म्हणत मुलीनंतर थेट नातवाला उभं केलं, अजित पवारांचे काकांवर टीकास्त्र
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement