Eknath Shinde Amit Shah : एकनाथ शिंदे नाराज! अमित शाहांसोबतच्या 20 मिनिटांच्या बैठकीत काय झालं?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Government Formation Eknath Shinde : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्वतंत्र भेट घेतली आणि खदखद व्यक्त केली.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत राज्यात स्थिर सरकारसाठी जनतेने महायुतीला प्रचंड बहुमताने पुन्हा एकदा सत्तेत बसवले. मात्र, महायुतीच्या सत्तेचा घोळ मिटला नाही. महायुती सरकारचा नवा मुख्यमंत्री कोण, कोणत्या पक्षाला कोणते खाते मिळणार यावर अजूनही तोडगा निघाला नाही. तर, दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्वतंत्र भेट घेतली आणि खदखद व्यक्त केली.
राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सहभागी झाले होते. या बैठकीच्या पूर्वी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची स्वतंत्र बैठक झाली. तर, दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली.
advertisement
अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत काय झाले?
एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात जवळपास 20 मिनिटे बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर महायुतीचे सरकार सत्तेत आले. अडीच वर्षाच्या कालावधीत आपण कोणतीही मागणी केली नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. पण, गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आपल्या सगळ्या मागण्या शाह यांच्यासमोर ठेवल्या.
advertisement
एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेसाठी 12 मंत्रिपदांची अमित शाह यांच्याकडे मागणी केली. त्यासोबतच विधान परिषदेच्या सभापतीपदाची देखील बैठकीत शिंदे यांच्याकडून मागणी करण्यात आली. त्याशिवाय गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केल्याचे सूत्रांनी दिली. पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी विनंतीही शिंदेनी अमित शाहांना केली.
advertisement
एकनाथ शिंदे नाराज?
राज्याच्या विधानसभेची निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवण्यात आली. भाजपला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला. अपक्षांसह भाजपचे संख्याबळ 137 पर्यंत गेले. तर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने अपक्षांच्या पाठिंब्यासह आपले संख्याबळ 60 हून अधिकवर नेले. महायुतीला मिळालेले यश हे मुख्यमंत्री यांच्या चेहऱ्यावर मिळाले आहे. त्यांची जनसामान्यात तयार झालेली प्रतिमा, लोकप्रिय निर्णयांचा मोठा वाटा आहे असा सूर शिवसेनेच्या गोटात आहे. शिवसेना मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार असली तरी महत्त्वाची खाती आपल्याला देण्यात यावे याची मागणी शिवसेनेने केली.
advertisement
इतर संबंधित बातमी :
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 29, 2024 1:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde Amit Shah : एकनाथ शिंदे नाराज! अमित शाहांसोबतच्या 20 मिनिटांच्या बैठकीत काय झालं?


