Maharashtra New CM : मुख्यमंत्रीपदावरून दिल्लीत खलबतं, शाह-तावडेंच्या भेटीत काय झालं? वाचा इनसाईड स्टोरी

Last Updated:

Maharashtra Govt Formation : अमित शाह आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून खलबतं झाली. भाजपच्या या दोन्ही नेत्यांमधील बैठकीत झाले, याची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.

CM पदावरून शाह-तावडेंची बंद दाराआड खलबतं, बैठकीत काय झालं? Inside Story
CM पदावरून शाह-तावडेंची बंद दाराआड खलबतं, बैठकीत काय झालं? Inside Story
प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी, नवी दिल्ली: राज्यात विधानसभा निवडणूक निकालात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. मात्र, त्यानंतरही मुख्यमंत्रीपदावरून तिढा सुरू असल्याचे चित्र आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील, तो मान्य असेल असे त्यांनी म्हटले. त्यांनतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून खलबतं झाली. भाजपच्या या दोन्ही नेत्यांमधील बैठकीत झाले, याची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
महायुती सरकारचा नवा मुख्यमंत्री कोण असणार, यावर आता दिल्लीतील बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. आज दिल्लीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आज बैठक होणार आहे. या बैठकीच्या आधी अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात राज्याच्या राजकारणावरून बैठक झाली.
advertisement

शाह-तावडे यांच्या बैठकीत काय झालं?

अमित शाह आणि विनोद तावडे यांच्या बैठकीत महायुती सरकारचा विषय प्रामुख्याने असल्याची माहिती सूत्रांनी दिली. “महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा” या समीकरणावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अमित शाह यांनी या बैठकीत विनोद तावडे यांच्याकडून महाराष्ट्राच्या मराठा समाजाची समीकरणं समजून घेतली. देवेंद्र फडणवीस यांची राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यास मराठा मते कशी टिकवता येतील, यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास मराठा समाजाच्या मतांवर किती परिणाम होऊ शकतो याची बेरीज-वजाबाकी या बैठकीत करण्यात आली. मराठा चेहऱ्याऐवजी दुसरा चेहरा दिला तर मराठा मतं दुखावण्याची चिंता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला सतावत आहे. त्यामुळेच मराठा समाज आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहांनी आढावा घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
भाजपची महाराष्ट्रात सत्ता आल्यापासून म्हणजेच 2014 ते 2024 पर्यंत मराठा समाजाची आंदोलन, कोर्टाचे निकाल, मराठा नेत्यांची भूमिकेचा आढावा शाह यांनी तावडे यांच्यासोबतच्या बैठकीतून घेतला. भवितव्याच्या दृष्टीनं मराठा चेहरा किती महत्वाचा आहे याबाबत सर्व गणितांची मांडणी करण्यात आली. आगामी निवडणुका, फडणवीसांचा चेहरा आणि मराठा, ओबीसीचा मतांबाबत चर्चा या बैठकीत चर्चा झाली.
advertisement

मुख्यमंत्रीपदाबाबत आज होणार निर्णय?

राज्याच्या नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस मतदान झाले. महायुतीच्या पारड्यात 234 जागा आल्या. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत तिढा सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे आज राजधानी दिल्लीत होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दिल्लीत आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आज बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राज्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra New CM : मुख्यमंत्रीपदावरून दिल्लीत खलबतं, शाह-तावडेंच्या भेटीत काय झालं? वाचा इनसाईड स्टोरी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement