Maharashtra Rain Updates: मुंबईसाठी पुढील 12 तास महत्त्वाचे, राज्यात स्थिती काय? CM फडणवीसांनी सगळं सांगितलं

Last Updated:

Maharashtra Rains Updates : मुंबईकरांची पावसाने दाणादाण उडवली असून मराठवाड्यातही जोरदार पाऊस झाला आहे. राज्यातील पावसाने दिलेल्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला.

मुंबईसाठी पुढील 12 तास महत्त्वाचे, राज्यातील परिस्थिती काय? CM फडणवीसांनी सगळं सांगितलं
मुंबईसाठी पुढील 12 तास महत्त्वाचे, राज्यातील परिस्थिती काय? CM फडणवीसांनी सगळं सांगितलं
मुंबई: राज्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईकरांची पावसाने दाणादाण उडवली असून मराठवाड्यातही जोरदार पाऊस झाला आहे. राज्यातील पावसाने दिलेल्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले असून पूर स्थितीला हाताळण्याबाबतचे निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्रालयातील उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्याच्या कंट्रोल रूम मधून सर्व जिल्हाधिकारी यांच्या सोबत संवाद साधला. गेल्या दोन दिवसांपासून खूप अतिवृष्टी होत आहेत. जवळपास 15 ते 16 जिल्ह्यात रेड आणि ॲारेज अलर्ट आहे. काही जिल्ह्यात दोन्ही अलर्ट आहेत. कोकण विभागात जास्तीत जास्त रेड अलर्ट आहे. वशिष्ठी नदीच्या पातळींवर लक्ष ठेऊन आहोत. नाशिकमध्ये तापी नदी पातळीत वाढ मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये हानी झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
advertisement
पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस मात्र इशारा पातळी ओलंढली नाही कोणतीही हानी नाही. अलमट्टी येथे आपण एक इंजिनिअर परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी बसवून ठेवले आहे. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याबाबत कर्नाटक सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिली.
पुणे विभागातील घाट सेक्शन आहे.सांगली आणि कोल्हापूर येथे रेड अलर्ट आहे. छत्रपती संभाजी नगर मध्ये बीड लातूर नांदेड मध्ये पूरग्रस्त स्थिती आहे. नांदेडच्या मुखेड 206 मिमि पाऊस पडला. त्या ठिकाणी 5 लोक बेपत्ता झाली आहेत 150 जनावर वाहून गेली आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू असून आता लष्कराचे एक पथकी मदत आणि बचावकार्यासाठी दाखल झाले असून तेलंगणा सरकार सोबत देखील व्यवस्थित समन्वय सुरू असल्याची माहिती मुख्यमत्र्यांनी दिली.
advertisement

मुंबईत काय स्थिती?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मुंबईमध्ये सर्वाधिक पाऊस चेंबूर पावसात झाल्याचं पाहायला मिळत आहे. १४ ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. मात्र, रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली नाही. पुढील 12 तास मुंबई साठी रेड अलर्ट देण्यात आला असून मुंबईसाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे. मेट्रो वाहतुकीवर कोणाताही परीणाम झालेला नाही. 170० मिमि पाऊस झाला तरीही मेट्रो वाहतूक सुरळीत सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
advertisement

 शेतीचंही नुकसान...

राज्यातील 4 लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. ज्या भागात नुकसान झालेलं आहे त्या भागात सर्व अधिकार हे स्थानिक जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्र्‍यांनी दिली.

इतर संबंधित बातमी:

advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Rain Updates: मुंबईसाठी पुढील 12 तास महत्त्वाचे, राज्यात स्थिती काय? CM फडणवीसांनी सगळं सांगितलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement