Maharashtra Govt : कामगारांना दिलासा की त्रास? आता 9 तास नव्हे तर 12 तासांची ड्युटी, कायद्यात सरकारकडून बदल

Last Updated:

Maharashtra Cabinet Meeting : गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी वाढवण्याचा दावा करत राज्यातील महायुती सरकारने कामाच्या तासांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

AI Image
AI Image
मुंबई: गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी वाढवण्याचा दावा करत राज्यातील महायुती सरकारने कामाच्या तासांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कारखाने अधिनियम व आस्थापन अधिनियमात महत्त्वाचे बदल केले आहेत. या निर्णयानुसार, कारखान्यातील कामगारांचे दैनंदिन कामाचे तास 9 वरून थेट 12 तासांपर्यंत वाढवले जाणार आहेत. तर दुकाने व आस्थापनांमध्ये कामाचे तास 9 वरून 10 तासांपर्यंत करण्यात येणार आहेत. महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयावर कामगार संघटनांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.
advertisement
केंद्र सरकारच्या कृती दलाने सुचविलेल्या सुधारणांनुसार कारखाने अधिनियम १९४८ मध्ये बदलांना बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि त्रिपुरा या राज्यांनी आधीच अशा प्रकारचे बदल केलेले आहेत.
या सुधारणांमुळे उद्योगांना जास्त मागणी असलेल्या काळात कामगारांच्या कमतरतेचा अडथळा येणार नसल्याचा दावा सरकारने केला आहे. तसेच, कायदेशीर पातळीवर कामगारांना योग्य वेतन संरक्षणासह अतिरिक्त उत्पन्न मिळेल. ओव्हरटाईम मर्यादा वाढवल्यामुळे बेकायदेशीररीत्या मोबदला न देता काम करून घेण्याच्या प्रकारावर आळा बसेल असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. वाढीव अतिकालिक तासांबाबत कामगारांना वेतनाच्या दुप्पट दराने मोबदला दिला जाईल, असा दावा करण्यात आला आहे.
advertisement
कारखाने अधिनियम 1948 तील आधीच्या बदलानुसार, दैनंदिन कामाचे तास हे 9 तासांहून आता 12 तास करण्यात येणार आहे. कामांच्या तासात बदल झाल्याने विश्रांतीसाठी ब्रेक हा 5 तास 30 मिनिटांऐवजी आता 6 तास 30 मिनिटे इतका असणार आहे. ही सुधारणा फक्त २० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांवर लागू राहणार आहे. त्याशिवाय, या सुधारणांमुळे 20 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या आस्थापनांना नोंदी प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहणार नाही. मात्र केवळ सूचनापत्रांन्वये व्यवसाय सुरु करण्याबाबत अवगत करणे आवश्यक राहणार आहे.
advertisement

आठवड्यात 48 तासच कामाची मर्यादा...

कारखान्यांमधील कामगारांना एका आठवड्यात (एक दिवसाची रजा वगळता) जास्तीतजास्त 48 तासच काम करणे बंधनकारक आहे. नव्या नियमानुसार, ही मर्यादा कायमच राहणार आहे.  याचाच अर्थ कामगारांना प्रत्येक दिवशी सरासरी 8 तास काम करणे बंधनकारक आहे. एका कारखान्यात कामगाराने 12 तास काम केले तरी त्यांना ओव्हरटाईमचा मोबदला द्यावा लागणार आहे. त्याशिवाय, एक बदली रजाही द्यावी लागणार आहे.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Govt : कामगारांना दिलासा की त्रास? आता 9 तास नव्हे तर 12 तासांची ड्युटी, कायद्यात सरकारकडून बदल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement