Maharashtra Elections Results : बंडखोर, अपक्षांचा मविआला झटका, किती मतदारसंघात बसली पराभवाची झळ?

Last Updated:

Maharashtra Assembly Maha Vikas Aghadi : महायुतीच्या या दमदार विजयात नाराज बंडखोर, अपक्षांचाही हातभार असल्याचे समोर आले आहे. महायुतीच्या आणि आघाडीतील बंडखोरांमुळे महाविकास आघाडीला 30 जागांवर फटका बसला आहे.

बंडखोर, अपक्षांचा मविआला झटका, किती मतदारसंघात बसली पराभवाची झळ?
बंडखोर, अपक्षांचा मविआला झटका, किती मतदारसंघात बसली पराभवाची झळ?
मुंबई :  विधानसभा निवडणूक निकालात राज्यात महायुतीची मोठी लाट आली. या लाटेत विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीचे पानिपत झाले. महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागा मिळवताना दमछाक झाली. राज्यात आता विरोधी पक्ष नेतेपदासाठी आवश्यक असणारे संख्याबळही विरोधी पक्षाला मिळवता आले नाही. तर, दुसरीकडे महायुतीच्या या दमदार विजयात नाराज बंडखोर, अपक्षांचाही हातभार असल्याचे समोर आले आहे. महायुतीच्या आणि आघाडीतील बंडखोरांमुळे महाविकास आघाडीला 30 जागांवर फटका बसला आहे.
जागा वाटप आणि उमेदवारीच्या मुद्यावर राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांना नाराजीचा सामना करावा लागला होता. जागा वाटपानंतर अनेक इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली. तर, दुसरीकडे महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या पाठिंब्यावर असलेले बंडखोर, मविआतील बंडखोर अपक्ष उमेदवारांमुळे महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला.

अपक्षांनी विजयाचे गणित बिघडवलं..

advertisement
भाजप , शिवसेना आणि अजित पवार समर्थित अपक्षांमुळेच नव्हे तर मविआत झालेल्या बिघाडीमुळे जवळपास 30 मतदार संघात महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. नागपूर मध्य या मतदारसंघात भाजपचे प्रविण दटके हे 11 हजार 632 मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके राहिले. त्यांना 78 हजार 928 मते मिळाली. तर, अपक्ष उमेदवार रमेश पुणेकर यांना 23 हजार 302 मते मिळाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काशिनाथ दाते हे 1526 मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राणी लंके यांचा पराभव केला. या मतदारसंघात बंडखोरी करणारे संदेश कार्ले यांना 10 हजार 803 मते मिळाली. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूरमध्ये अजित पवार गटाचे दत्ता भारणे यांनी 19 हजार 410 मतांनी विजय मिळवला. त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. या ठिकाणी बंडखोर अपक्ष उमेदवार प्रविण माने यांनी तब्बल 37 हजार 917 मते मिळवली.
advertisement
महाविकास आघाडीला बंडखोरांची समज काढण्यास यश मिळाले असते आणि महायुतीच्या उमेदवारांसह बंडखोरांसाठी रणनीति आखली असती तर, विजयात आणखीत भर पडली असती.

आणखी कोणत्या मतदारसंघात अपक्ष ठरले निर्णायक?

फुलंब्री , गंगापूर, शहापूर , इंदापूर , भोर , चिंचवड , आंबेगाव , अकोले, शेवगाव , पारनेर, माजलगाव , अमरावती, साक्री , देवळी , वर्धा, अर्जुनी मोरगाव , नागपूर पश्चिम , वरोरा , नागपूर मध्य , राजुरा , पाचोरा , अहेरी , किनवट, मुखेड , परतूर , घनसावंगी , जालना , सिल्लोड , गेवराई, श्रीगोंदा आदी मतदारसंघात अपक्ष, बंडखोरांमुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Results : बंडखोर, अपक्षांचा मविआला झटका, किती मतदारसंघात बसली पराभवाची झळ?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement