काशीद बीच ठरला मृत्यूचा सापळा, मित्र पैसे आणायला जाताच पुण्यातील तरुणासोबत घडला अनर्थ

Last Updated:

Death on Kashid Beach : थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी काशीद बीचवर गेलेल्या पुण्यातल्या एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे.

News18
News18
रायगड : थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी अनेकांनी कोकणसह गोव्याला जाणं पसंत केलं होतं. कोकणातील समुद्र किनारे गर्दीने भरून गेले होते. अशात थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी कोकणात गेलेल्या पुण्यातल्या एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. काशीद बीचवर त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात देखील या बीचवर एका तरुणाचा मृत्यू झाला होता. अशात आता पुन्हा एका तरुणाचा मृत्यू झाल्याने काशीद बीच मृत्यूचा सापळा ठरत असल्याची चर्चा आहे.
प्रकाश सहस्त्रबुद्धे असं मृत पावलेल्या ३१ वर्षीय पर्यटकाचं नाव आहे. तो पुण्यातील रहिवासी असून आपल्यासोबत अन्य तीन मित्रांना घेऊन काशीद बीच फिरायला गेला होता. पण मृत्यूच्या घटनेनं थर्टी फर्स्टच्या आनंदात विर्जन पडलं आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता प्रकाश आपले मित्र गणेश सहस्त्रबुद्धे, शदाब अविद मलिक आणि राकेश राजू पवार यांच्यासह काशीद बीचवर पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेला होता.
advertisement
बराच वेळ पोहून झाल्यानंतर चारही मित्रांना स्पोर्ट बाइक सफारीचा आनंद घ्यायचा होता. त्यामुळे प्रकाशचे सगळे मित्र पैसे आणण्यासाठी गेले. यावेळी प्रकाश मात्र पोहत राहिला. मित्र पैसे आणायला गेल्यानंतर प्रकाश पाण्यात बुडाला. पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे, मित्र निवांत होते. प्रकाश पोहून झाल्यावर पाण्याबाहेर आला असेल, असं त्यांना वाटलं. पण दीड तासानंतर प्रकाश पाण्यात तरंगत असताना दिसला.
advertisement
ही घटना उघडकीस येताच पोलीस आणि लाइफ गार्डने पाण्यात उतरून त्याला बाहेर काढलं. पण तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याला तातडीने मुरूड रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार हरी मेंगाळ करत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काशीद बीच ठरला मृत्यूचा सापळा, मित्र पैसे आणायला जाताच पुण्यातील तरुणासोबत घडला अनर्थ
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement