PM रिपोर्ट वेगळा, CM दुसरंच सांगतात, जातपात विसरून एक व्हावे लागेल, जरांगेंनी ठणकावले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांनी परभणीत जाऊन मयत सोमनाथ यांच्या आई आणि भावाशी संवाद साधून आंदोलनावेळची परिस्थिती जाणून घेतली.
सिद्धार्थ गोदाम, परभणी : मनोज जरांगे पाटील यांनी परभणीत मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाशी भेट घेतली. संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली त्या ठिकाणी बुधवारी दुपारी जाऊन त्यांनी डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर आंदोलनस्थळी जाऊन सोमनाथ यांच्या आई आणि भावाशी त्यांनी संवाद साधला.
कुटुंबीयांनी काही व्हिडीओ फोटो दाखवून अन्याय होत असल्याची भावना मांडली. परभणीमध्ये झालेला प्रकार अत्यंत संतापजनक आहे. शवविच्छेदन अहवाल वेगळा आहे आणि मुख्यमंत्री मात्र वेगळे कारण कसे काय सांगतात. जात पात विसरून सगळ्यांनी न्यायासाठी एकत्र यावे लागेल, असे सांगत सोमनाथ यांना न्याय मिळेपर्यंत मराठा समाज त्यांच्या पाठिशी राहील, अशी ग्वाही यानिमित्ताने मनोज जरांगे यांनी दिली.
advertisement
ज्यावेळी सोमनाथ यांच्या आई आणि भावाने सोमनाथच्या अंगावर पडलेल्या व्रणाचे फोटो दाखवले, त्यावेळी मनोज जरांगे गलबलून गेले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. हा प्रकार अतिशय संतापजनक असल्याचे सांगत एकत्र येऊन न्यायासाठी लढू, अशा भावना जरांगे यांनी बोलून दाखवल्या.
दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी जेष्ठ दलित नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबाची सुद्धा भेट घेतली..विजय वाकोडे हे परभणीत उसळलेल्या आंदोलनात सामील होते..नंतर मात्र त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. विजय वाकोडे हे दलित पँथर पासून दलित चळवळीत सहभागी होते..नामांतराच्या लढ्यात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
advertisement
शवविच्छेदन अहवालात पोलीस मारहाणीमुळे मृत्यू
सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले पण आम्ही वस्तुस्थिती जाणून घेतली आहे, सोमनाथ सुर्यवंशींचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे झाल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये सांगितले आहे. सोमनाथ सुर्यवंशी व संतोष देशमुख प्रकरणी अधिवेशनात प्रश्न मांडला पण मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला खोटी माहिती दिली. काँग्रेस यासंदर्भात मुख्यमंत्र्यांविरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणेल. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्याऱ्यांना सोडणार नाही. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक समाजावर भाजपा सरकार अत्याचार करत आहे. काँग्रेस या अत्याचाराविरोधात आवाज उठवून पीडित कुटुंबांना न्याय देण्याचे काम करेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
view commentsLocation :
Parbhani,Maharashtra
First Published :
Dec 25, 2024 5:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
PM रिपोर्ट वेगळा, CM दुसरंच सांगतात, जातपात विसरून एक व्हावे लागेल, जरांगेंनी ठणकावले










