Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात फूट? जरांगे पाटलांना वगळून आज कोल्हापुरात परिषद

Last Updated:

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या या राज्यस्तरीय परिषदेसाठी राज्यभरातून मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. राज्यातील विविध मराठा संघटना एकत्र येणार असल्या तरी या परिषदेतून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना वगळण्यात आले आहे.

News18
News18
ज्ञानेश्वर साळोंखे, प्रतिनिधी, कोल्हापूर: कोल्हापुरात आज मराठा समाजाची राज्यस्तरीय परिषद पार पडत आहे. मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या या राज्यस्तरीय परिषदेसाठी राज्यभरातून मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. राज्यातील विविध मराठा संघटना एकत्र येणार असल्या तरी या परिषदेतून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना वगळण्यात आले आहे. जरांगे पाटील यांची आरक्षणाबाबतची भूमिका न पटलेल्या मराठा संघटना कोल्हापूरमध्ये एकत्र येत असल्याचे म्हटले जात आहे.
राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अजूनही लढा सुरू आहे. मराठा आरक्षण हा राज्यातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा आरक्षण संघर्ष समिती, सकल मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने राज्यभरात 50 पेक्षा अधिक मोर्चे काढण्यात आले. अंतरवाली सराटीत मराठा आरक्षण उपोषणावर झालेल्या आंदोलनावर लाठीचार्जनंतर आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा पेटले. मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्त्वात मराठा आंदोलक एकवटले. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन झाले. पण त्यानंतरही फारसे यश मिळाले नाही. काही ठिकाणी कुणबी प्रमाणपत्रावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली.
advertisement
कोल्हापूरमध्ये आज होणाऱ्या परिषदेत मराठा समाज आरक्षणसंदर्भात प्रलंबित प्रश्न, पुढील भूमिका व दिशा ठरविण्यासाठी राज्यभरातील विविध 42 मराठा आरक्षण संघटनांचे पदाधिकारी, मराठा आरक्षण विषयावरील तज्ज्ञ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्याशिवाय ही बैठक पार पडत असल्याने मराठा आरक्षणात फूट पडली की काय, अशी चर्चा रंगली आहे.

कोण राहणार उपस्थित?

advertisement
या परिषदेत शिवसंग्राम संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ज्योती विनायक मेटे, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक, मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष, सुभाषदादा जावळे-पाटील, राष्ट्रीय मराठा महासंघ मुंबईचे अध्यक्ष, दिलीपदादा जगताप, शिवसंग्राम स्वराजचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे, मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे, शंभुराजे युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुनील मोरे, संभाजी बि- गेडचे अध्यक्ष संतोष पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात फूट? जरांगे पाटलांना वगळून आज कोल्हापुरात परिषद
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement