मंत्रिपदाचा चार्ज घेताच जयकुमार गोरेंचे आव्हान, रामराजे म्हणजे फलटण नाही, त्यांची शक्ती...

Last Updated:

Ramraje Nimbalkar vs Jaykumar Gore: रामराजे आणि आमच्यातील संघर्ष संपला कारण त्यांच्यात त्राण, शक्ती राहिली नाही, अशी टीका नवनियुक्त ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे.

जयकुमार गोरे आणि रामराजे निंबाळकर
जयकुमार गोरे आणि रामराजे निंबाळकर
 सचिन जाधव, प्रतिनिधी, सातारा : रामराजे निंबाळकर म्हणजे फलटण नाही. ते कोणत्या पक्षात आहेत, हे मला माहित नाही, त्यांनाही माहिती नाही. त्यांची शक्ती आणि त्यांच्यातील त्राण आता संपला आहे, अशी बोचरी टीका नवनियुक्त ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी रामराजे निंबाळकर यांना उघड आव्हान देताना त्यांची राजकीय शक्ती क्षीण झाल्याचे म्हटले.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नवनियुक्त मंत्री

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे यांनी अभिवादन केले. यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक -निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली.
advertisement

रामराजे यांच्यातली राजकीय शक्ती संपली, त्यांच्यात आता त्राण राहिला नाही

रामराजे आणि आमच्यातील संघर्ष संपला कारण त्यांच्यात त्राण, शक्ती राहिली नाही. रामराजेंना स्वतःला ते कोणत्या पक्षात आहेत हे माहिती नाही आणि मलाही माहिती नाही. फलटण म्हणजे केवळ रामराजे नाही. त्यामुळे त्यांच्याशी काय संघर्ष करायचा, असे जयकुमार गोरे म्हणाले.

ज्यांनी आम्हाला पाण्यापासून दूर ठेवले, त्यांच्याशी आमचा संघर्ष केला

advertisement
आघाडी सरकारमध्ये रामराजे निंबाळकर यांच्याकडे कृष्णा खोऱ्याचा कार्यभार होता. त्यामाध्यमातून त्यांनी फलटण तालुका दुष्काळमुक्त केला परंतु आमच्या तालुक्याला किंचितही पाणी द्यायचा प्रयत्न त्यांनी केला नाही. ज्यांनी आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवले, त्यांच्याशी आमचा संघर्ष होता. मग ते रामराजे निंबाळकर असोत की शरद पवार असोत. परंतु आता माझा संघर्ष रामराजे निंबाळकर यांच्याशी नसेल. त्यांच्यातली राजकीय शक्ती क्षीण झाली आहे, अशी टीका जयकुमार गोरे यांनी केली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मंत्रिपदाचा चार्ज घेताच जयकुमार गोरेंचे आव्हान, रामराजे म्हणजे फलटण नाही, त्यांची शक्ती...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement