हात, पाय आणि तोंड बांधून अल्पवयीन विद्यार्थिनीला शाळेच्या टेरेसवर सोडलं, नगरमधील खळबळजनक घटना
- Published by:sachin Salve
Last Updated:
अहमदनगर जिल्ह्यापासून जवळच असलेल्या पिंपळगाव उज्जैनी येथील एका शाळेत ही घटना घडली आहे.
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी
अहमदनगर: अहमदनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका शाळेतील विद्यार्थिनीचे हात पाय आणि तोंड बांधून शाळेच्या टेरेसवर सोडल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने ही चिमुरडी सुखरुप आहे. तिच्या सुटकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यापासून जवळच असलेल्या पिंपळगाव उज्जैनी येथील एका शाळेत ही घटना घडली आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे हात पाय आणि तोंड बांधून शाळेच्या टेरेसवर सोडून दिलं होतं. याबाबत अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
advertisement
सोमवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीचे तोंड दाबून तिला शाळेच्या टेरेसवर नेऊन तिचे हात, पाय आणि तोंड बांधून ठेवले. साडेपाच वाजता टेरेसवरून आवाज येत असल्याने गावातील काही ग्रामस्थ शाळेच्या टेरेसवर गेले असता त्यांना ही मुलगी हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या मुलीला सोडवतानाचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.
view commentsLocation :
Nagardeole,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
August 06, 2024 8:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हात, पाय आणि तोंड बांधून अल्पवयीन विद्यार्थिनीला शाळेच्या टेरेसवर सोडलं, नगरमधील खळबळजनक घटना


