Weather Monsoon Updates : आनंदवार्ता! यंदाची 'मान्सून एक्स्प्रेस' सुस्साट, वेळेआधीच बरसणार पाऊस

Last Updated:

Monsoon Updates : आता हवामान विभागाने मान्सूनबाबत आनंदवार्ता दिली आहे. यंदाचा मान्सून केरळमध्ये लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

File Photo
File Photo
मुंबई: उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसाने काहीसा दिलासा दिला. तर, शेतकऱ्यांचे नुकसान केले. अवकाळी पावसानंतर आता मान्सून कधी येणार याची प्रतीक्षा लागली आहे. महाराष्ट्रातील तापमान जवळपास एप्रिल आणि मे या दोन महिन्यात 45 अंश डिग्री सेल्सियसवर पोहोचलं आणि त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अवकाळी पावसाचे ढग आले. आता हवामान विभागाने मान्सूनबाबत आनंदवार्ता दिली आहे. यंदाचा मान्सून केरळमध्ये लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
भारतातील हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) यंदा नेहमीपेक्षा लवकरच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. भारत हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यंदा 27 मे रोजीच राज्याच्या किनारपट्टीवर पोहोचू शकतो. हा अंदाज खरा ठरल्यास 2009 नंतर प्रथमच मान्सून वेळेपूर्वी भारतात आगमन करेल.
advertisement
2009 साली मान्सूनचं 23 मे रोजी केरळमध्ये आगमन झालं होतं. जे आतापर्यंतचे सर्वात लवकरचे आगमन मानले जाते. सध्या दिलेल्या अंदाजांवरून दिसते की, यंदाचा मान्सून त्याच्याकडे झुकणारा आहे आणि पुन्हा एकदा वेळेपूर्वी दाखल होण्याचा विक्रम घडवू शकतो.
भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन केरळमधून सुरू होऊन उत्तर व पश्चिम दिशेने पसरते. केरळमध्ये पावसाची सुरुवात झाल्यानंतर साधारणतः 8 जुलैपर्यंत संपूर्ण देशात मान्सून पोहोचतो. त्यानंतर सप्टेंबरच्या मध्यापासून म्हणजेच 17 सप्टेंबरपासून वायव्य भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि तो 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्णतः परततो.
advertisement
देशभरात शेतकरी, उद्योगधंदे आणि पाणीसाठ्यांवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था मोसमी पावसावर खूप प्रमाणात अवलंबून असते. त्यामुळे वेळेपूर्वी मान्सूनचे आगमन हे अनेकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. लवकर पावसामुळे शेती हंगाम वेळेवर सुरू होईल, तर जलसाठ्यांमध्येही पाण्याची वाढ होण्यास मदत मिळेल.
हवामान खात्याच्या अधिकृत घोषणेस अद्याप वेळ आहे. मात्र,परंतु सध्या दिलेल्या हवामान विभागाने दिलेल्या अंदाजांमुळे सध्या सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यंदा मान्सून लवकर आल्यास केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनाही उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Monsoon Updates : आनंदवार्ता! यंदाची 'मान्सून एक्स्प्रेस' सुस्साट, वेळेआधीच बरसणार पाऊस
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement