Nandurbar News : बाळ गेलं म्हणून आईनं टाहो फोडला, पण देवदूत डॉक्टरानं चमत्कार केला, काय झालं नेमकं?

Last Updated:

Nandurbar News : आपल्या हातातला दोन महिन्याचा कोवळा जीव गेला असल्याची भावना आदिवासी कुटुंबात आली अन् आईने हंबरडा फोडला. मात्र, देवदूत असं संबोधले जाणारे डॉक्टर खरंच देवदूत ठरले.

News18
News18
नंदुरबार: दोन महिन्यांच्या कोवळ्या जीवाला उलट्या झाल्या अन् काही वेळेतच प्रतिसाद देणंच बंद केलं. आपल्या हातातला दोन महिन्याचा कोवळा जीव गेला असल्याची भावना आदिवासी कुटुंबात आली अन् आईने हंबरडा फोडला. मात्र, देवदूत असं संबोधले जाणारे डॉक्टर खरंच देवदूत ठरले. त्यांनी निपचित पडलेल्या बाळाचा जीव परत आणला. दु:खाच्या अश्रूंचे रुपांतर आनंदाश्रूमध्ये करण्याची घटना नंदूरबार जिल्ह्यातील सूर्यपूर गावात घडली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
तेलखेडी येथील मीनाबाई सचिन पावरा होळीनिमित्त गुरुवारी दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन माहेरी सूर्यपूर येथे आल्या होत्या. उन्हाच्या तडाख्याचा लहान मोठ्यांना त्रास होत असताना बाळालाही त्रास होऊ लागला. बाळाला उलट्या सुरू झाल्या. काही वेळे उलट्यानंतर बाळाची अचानक हालचाल थांबली. बाळाने मान टाकली, असे समजून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही तासांपूर्वी बाळाचे कौतुक आणि काळजी घेणारं कुटुंब शोकसागरात बुडालं. जड अंतःकरणाने बाळाच्या अंत्यविधीला सुरुवात झाली.
advertisement

अन् डॉक्टर ठरले देवदूत...

कुटुंबातील नातेवाइकांनी आरोग्य केंद्रातील डॉ. गणेश तडवी यांच्या कानावर ही माहिती दिली. डॉ. तडवी घरी आले. बाळाला तपासले आणि , बाळाला रुग्णालयात घेऊन जावे लागेल असे सांगितले. मात्र, कुटुंब बाळाच्या अखेरच्या प्रवासाला लागले. ते बाळाला गावी घेऊन जात होते. अखेर डॉक्टरांनी आपला अनुभव पणाला लावत तेथेच बाळावर उपचार सुरू केले. त्यांनी बाळाच्या पायाला टिचक्या मारल्या आणि बाळाने श्वासोच्छवास घेण्यास सुरुवात केली. डॉक्टरांनी बाळाला एक दिवस आरोग्य केंद्रात उपचारासाठी ठेवले. बाळ आता सुखरुप असल्याचे त्यांनी डॉ. तडवी यांनी सांगितले.
advertisement

बाळाला नेमका कसला त्रास झाला?

बाळाचा मृत्यू झाला, अशीच धारणा कुटुंबाची झाली होती. मात्र, डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नाने बाळाला जीवदान मिळाले. शहादा येथील खासगी रुग्णालयात बाळाला दाखल केले आहेत. सध्या न्युमोनियाची साथ सुरू आहे. बाळाच्या आईला दूध कमी येत असल्याने सोडियम आणि कॅल्शियमची मात्रा कमी झाल्यामुळे बाळाला त्रास झाला होता अशी माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nandurbar News : बाळ गेलं म्हणून आईनं टाहो फोडला, पण देवदूत डॉक्टरानं चमत्कार केला, काय झालं नेमकं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement