Mumbai BEST Elections : ठाकरे गटाचा धुव्वा, भाजपच्या पॅनलला पराभवाचा धक्का, बेस्टच्या निवडणुकीत बाजी कोणाची?

Last Updated:

Mumbai BEST Elections : मुंबईचं लक्ष बेस्ट पतपेढीच्या निकालाकडे लागलं होतं. मध्यरात्रीनंतर सुरू असलेल्या मतमोजणीचा निकाल जाहीर झाला आहे.

ठाकरे गटाचा धुव्वा, भाजपच्या पॅनलला धक्का, बेस्टच्या निवडणुकीत बाजी कोणाची?
ठाकरे गटाचा धुव्वा, भाजपच्या पॅनलला धक्का, बेस्टच्या निवडणुकीत बाजी कोणाची?
मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी बेस्ट पतपेढीच्या निकालाकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष बेस्ट पतपेढीच्या निकालाकडे लागलं होतं. मध्यरात्रीनंतर सुरू असलेल्या मतमोजणीचा निकाल जाहीर झाला आहे. ठाकरे गट आणि मनसे यांच्या कामगार संघटनेच्या पॅनेलचा धुव्वा उडाला असून प्रसाद लाड-प्रवीण दरेकर यांच्या पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे. बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव यांच्या पॅनेलने सर्वाधिक जागा जिंकत बाजी मारली आहे. दरम्यान, प्रसाद लाड यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे.
बेस्ट कर्मचारी पतसंस्थेच्या या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्या मनसेनं एकत्र येऊन एकच पॅनल उभं केलं होतं. या दोघांनीही एकत्र येण्याचे संकेत दिले होते त्या दृष्टीनं त्यांनी एक पाऊल उचललं असून संपूर्ण महाराष्ट्राला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. तर, भाजपचे आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, नितेश राणे, शिंदे गटाचे किरण पावसकर यांच्या कामगार संघटनांनी एकत्रित येत सहकार समृद्धी पॅनेल उभं करत आव्हान दिले होते.
advertisement
मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरू होणार होती. मात्र, मुंबईतील मुसळधार पावसामुळे मतमोजणी दुपारनंतर सुरू झाली. ही मतमोजणी रात्री उशिरा 2 वाजेपर्यंत सुरू होती. निवडणुकीमध्ये प्रसाद लाड यांच्या 'समृद्ध' पॅनेलचा पराभव करत, शशांक राव यांच्या पॅनेलने निर्णायक विजय मिळवला. अंतिम फेरीतील मतमोजणीत राव यांच्या पॅनेलने बाजी मारल्यामुळे त्यांना यश मिळाले आहे. मात्र, या निकालानंतर प्रसाद लाड यांच्या पॅनेलने पुन्हा एकदा मतमोजणी करण्याची मागणी केली.
advertisement

कोणाला किती जागा?

मिळालेल्या माहितीनुसार, मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलात ठाकरे गट-मनसे यांच्या उत्कर्ष पॅनेलची आघाडी होती. मात्र, या निवडणुकीच्या शेवटच्या दहा फेऱ्यांमध्ये शशांक राव यांच्या पॅनेलने आघाडी घेतली आणि त्यांनी विरोधी पक्षाच्या पॅनेलला मागे टाकले. या विजयामुळे शिवसेना, मनसे आणि प्रसाद लाड यांच्या 'समृद्ध' पॅनेलला मोठा धक्का बसला आहे.  शशांक राव यांच्या पॅनलला 14 जागा तर, प्रसाद लाड-प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाती पॅनेलला  7 जागा मिळाल्या. तर, ठाकरे-मनसेच्या पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही.
advertisement
या निवडणुकीमध्ये समृद्ध पॅनेल आणि शिवसेना-मनसेच्या पॅनेलला पराभूत करून शशांक राव यांच्या पॅनेलने विजयाची पताका फडकवली. कामगार वर्गात शशांक राव यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
शशांक राव यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपात प्रवेश केला. मात्र, या निवडणुकीत त्यांनी आपल्या कामगार संघटनेचे पॅनेल स्वतंत्रपणे मैदानात उतरवले होते. शशांक राव हे म्युनिसिपल मजदूर युनियनचे नेते होते. मात्र, संघटनेतील अंतर्गत वादानंतर त्यांनी संघटना सोडली होती. मात्र, बेस्ट वर्कर्स युनियनही त्यांच्या अधिपत्याखाली राहिली. त्यानंतर त्यांनी काही बेस्ट कामगार संघटना व इतर संघटनांसोबत बेस्ट संप आणि इतर आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai BEST Elections : ठाकरे गटाचा धुव्वा, भाजपच्या पॅनलला पराभवाचा धक्का, बेस्टच्या निवडणुकीत बाजी कोणाची?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement