Mumbai Local Accident : मनसेचा महामोर्चा उद्या रेल्वेवर धडकणार, मनसैनिकाने आधी नोटीस देऊनही दुर्लक्ष

Last Updated:

Mumbai Local Accident: दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण ८ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

राज ठाकरे-अविनाश जाधव
राज ठाकरे-अविनाश जाधव
मुंबई : मुंब्रा रेल्वे दुर्घटना विरोधात रेल्वे प्रशासनावर मनसेचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. उद्या ( मंगळवारी) सकाळी नऊ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. ठाण्यातील गावदेवी मैदानापासून ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा असणार आहे.
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण ८ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे. मात्र रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे.
आमच्या एका टिटवाळ्याच्या मनसैनिकांनी या आधी देखील मुंब्रा रेल्वे भागात मोठा अपघात होऊ शकतो असे पत्र दिले होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने हलगर्जीपणा दाखवला. जर प्रशासनाने त्या पत्राची दखल घेतली असती तर ही घटना झाली नसती, असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटले. या सर्व प्रसंगांमधून प्रवाशांना आणि नागरिकांना बाहेर यायचे असेल तर मनसेच्या मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन देखील अविनाश जाधव यांनी केले.
advertisement

रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेणार

मुंब्रा स्थानकाजवळील आजची घटना दुःखदायक आहे, आम्ही आज रेल्वे अधिकारी यांची भेट घेतली आहे. उद्या ठाण्यामध्ये धडक मोर्चा होतोय. तसेच उद्या मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांची यांची भेट घेणार आहोत. अशा घटना होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमचे इंजिन हे आता रेल्वे प्रशासनाला जोडावे लागणार आहे, असे मनसेच्या रेल्वे कामगार सेनेने म्हटलं आहे.
advertisement

राज ठाकरे मुंबई रेल्वे अपघातावर काय म्हणाले?

आज मुंबईत जो रेल्वे अपघात झाला तो दुर्दैवी आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, पण अशाच घटना रोज मुंबईत घडत आहेत. मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं-घेणं नाहीये. मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे. आम्ही सुद्धा ही मागणी केली होती, पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही.
advertisement
आज शहरांचं नियोजन पूर्णपणे विस्कटलं आहे. प्रचंड लोंढे येत आहेत. त्यांच्यासाठी मोठे रस्ते, ब्रिज, मेट्रो बांधली जात आहेत. उंच उंच इमारतींना परवानगी दिली जात आहे, पण पार्किंगचं काहीही नियोजन नाही. प्रत्येक शहरात ट्रॅफिकची गंभीर समस्या आहे. नवनवीन रस्ते, मेट्रो बांधून काहीही फरक पडत नाहीये, तरीही कुठलंच सरकार शहर नियोजनाचा किंवा बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांचा विचार करत नाहीये.
advertisement
आपलं सगळं लक्ष फक्त निवडणुका आणि प्रचार यावरच केंद्रित आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती करणार का? या प्रश्नापेक्षा आज मुंबईत प्रवास कसा होतोय, शहरांमध्ये आणि एकूणच राज्यात लोकं कशा अवस्थेत जगत आहेत- हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. माध्यमं हे प्रश्न उपस्थित करणार आहेत का? सरकारांना या प्रश्नांची उत्तरं मागणार आहेत का? कोणकोणाशी युती होणार, कोण काय म्हणाला, हे सगळं खरोखरच या गंभीर प्रश्नांपुढे क्षुल्लक आहे. आपण लोकांच्या प्रश्नांकडे वळणार आहोत का?
advertisement
मी स्वतः मुंबईत रेल्वेने बराच काळ प्रवास केला आहे. पण तेव्हा परिस्थिती थोडी बरी होती. आता रेल्वे स्टेशनवरची गर्दी पाहून धडकी भरते. हे खासदार, आमदार, मंत्री परदेशात जातात – तिथून काही शिकून येतात का? परदेशात अशी घटना घडली असती, तर तिथे ती कशी हाताळली गेली असती? आपल्याकडे मात्र काहीही नाही. इथे माणसाच्या जीवाला किंमतच नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Local Accident : मनसेचा महामोर्चा उद्या रेल्वेवर धडकणार, मनसैनिकाने आधी नोटीस देऊनही दुर्लक्ष
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement