Arun Gawli : मोठी बातमी! डॉन अरुण गवळी येणार तुरुंगातून बाहेर; ..म्हणून शिक्षेच्या मुदतीपूर्वीच होणार सुटका

Last Updated:

नागपुरातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे डॉन अरुण गवळीची शिक्षेच्या मुदतीपूर्वीच तुरुंगातून सुटका होणार आहे.

News18
News18
नागपूर, उदय तिमांडे, प्रतिनिधी :  नागपुरातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे डॉन अरुण गवळीची शिक्षेच्या मुदतीपूर्वीच तुरुंगातून सुटका होणार आहे. 2006 च्या शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात डॉन अरुण गवळी यानं शिक्षेतून सुट देण्याची मागणी केली होती.  त्यानुसार आता डॉन अरुण गवळीची शिक्षेच्या मुदतीपूर्वीच तुरुंगातून सुटका होणार आहे. अरुण गवळी हा सध्या  नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात नागपूच्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शिक्षेतून सूट मिळणार असल्यानं अरुण गवळी याला मोठा दिलासा मिळाला आहे.
अरुण गवळी याला नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या तो नागपूरच्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.  2006 च्या शासन निर्णयाच्या आधारे गवळीने शिक्षेतून सूट मिळावी अशी मागणी केली होती. 2006 च्या शासन निर्णयानुसार वयाची 65 वर्षे पूर्ण झालेल्या अशक्त, निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेत सूट मिळते. याच आधारावर अरुण गवळी यानं आपल्याला शिक्षेतून सूट मिळावी अशी मागणी केली होती.
advertisement
अरुण गवळीच्या याचीकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पुर्ण झाली होती, मात्र कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. मात्र आता 2006 च्या निर्णयानुसार त्यांची तुरुंगातून शिक्षेच्या मुदतीपूर्वीच सुटका होणार आहे. तुरुंगातून सुटका होणार असल्यानं गवळीला मोठा दिलासा मिळाला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Arun Gawli : मोठी बातमी! डॉन अरुण गवळी येणार तुरुंगातून बाहेर; ..म्हणून शिक्षेच्या मुदतीपूर्वीच होणार सुटका
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement