शेअर मार्केटमध्ये इन्वेस्टमेंट पोलीस कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतलं, ड्युटीवर असताना स्वत:वर झाडली गोळी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडल्यानंतर तातडीनं त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.सध्या त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागपूर, प्रतिनिधी उदय तिमांडे: जास्त पैसे मिळणं कुणाला नको असतं, प्रत्येकाला वाटतं कमी काळात श्रीमंत व्हावं. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून श्रीमंत होऊ दुप्पट कमाई होईल या उद्देशानं पैसे गुंतवले आणि फसला. शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठा नुकसान झालं. त्यामुळे कुटुंबियांवर मोठं संकट आलं. हातातला पैसा संपल्याने, नैराश्यातून नागपुरात पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला.
पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडल्यानंतर तातडीनं त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.सध्या त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपूरचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या बंगल्यावर गार्ड ड्युटीवर तैनात हा पोलीस कर्मचारी तैनात होता. पोलीस कर्मचारी विशाल तुमसरे असं त्यांचं नाव आहे.
विशाल यांनी आज सकाळी स्वतःच्याच बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. स्वतः पोलीस अधीक्षकांनी विशाल तुमसरेला एम्स रुग्णालयात नेऊन दाखल केले असून सध्या जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार सुरू असून त्यांची स्थिती गंभीर आहे. धक्कादायक बाब म्हणजे शेअर मार्केट मधील गुंतवणुकीत मोठा नुकसान झाल्यामुळे विशाल तुमसरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खात्रीलायक माहिती आहे.
advertisement
शेअर मार्केटमध्ये आपली जमापुंजी लावून पैसे दुप्पट करण्याचा धोका टाळावा, वारंवार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन लाखो रुपये कमवा अशा जाहिराती येत असतात. मात्र तिथे गुंतवणूक करणं जोखमीचं असतं. हे माहिती असूनही त्यांनी पैसे गुंतवले. त्यांना मोठं नुकसान झाल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. तुम्ही अशा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्य़ाआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं. शिवाय फक्त शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक हा एकच पर्याय कधीच ठेवू नये, आपला पोर्टफोलियो डाव्हर्सिफाय असावा असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
January 18, 2025 11:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
शेअर मार्केटमध्ये इन्वेस्टमेंट पोलीस कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतलं, ड्युटीवर असताना स्वत:वर झाडली गोळी


