Maharashtra Elections Nana Patole : फडणवीसांवर टीका करताना नाना पटोलेंची जीभ घसरली, ''हे स्वत:ला देव समजू लागलेत, पण...''
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Nana Patole On Devendra Fadnavis: महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षाबाबत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले आहे.
अकोला : विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. आता, जाहीर सभांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाले आहेत. आता जाहीर सभांमध्ये वक्तव्य करताना नेत्यांची जीभ घसरू लागली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षाबाबत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले आहे.
नाना पटोले यांनी अकोल्यात काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण यांच्यासाठी प्रचारार्थ सभा घेतली. या सभेला संबोधित करताना नाना पटोले यांची जीभ घसरली. अकोल्यातील आपल्या भाषणात ते म्हणाले, "भाजपला कुत्रा बनवण्याची वेळ आली आहे. आता या महाराष्ट्रातून भाजपला हटवण्याची वेळ आली आहे. आता सत्तेत आलेल्या या पक्षाला जागा दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले.
advertisement
नाना पटोले यांनी म्हटले की, 'भाजपवाले स्वतःला देव समजतात, त्यांची मस्ती वाढली आहे. दिल्लीतील लोक स्वतः ला विश्वगुरू मानतात. महाराष्ट्रात फडणवीस स्वतः ला देव मानतात. त्यामुळे त्यांच्या सत्तेचा माज उतरवून त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचे टीका पटोले यांनी केली. राहुल गांधी यांच्यावर भाजप खोटारडेपणा पसरवत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. भाजपची विचारसरणी मनुस्मृतीतून निर्माण झाली आहे आणि काही निवडक लोकांनी राज्य करत राहण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचा आरोप त्यांनी केला.
advertisement
फडणवीसांवर टीका...
नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, लाल रंग हा हिंदू धर्मात पवित्र समजला जातो. पण, फडणवीस-भाजप यांचा संबंध नक्षलवादाशी जोडतात. एक नववधू लाल साडी नेसते, तिचा कुंकू लाल असतो. याचा अर्थ ती नक्षलवादी आहे का? कोणीतरी देवेंद्र फडणवीस यांना समजून सांगा असेही पटोले म्हणाले.
advertisement
संजय राऊतांकडून आक्षेपार्ह भाषा...
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीदेखील भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना व्यापारी, दुकानदार वर्गावर आक्षेपार्ह भाषा वापरली. आपल्या फायद्यासाठी व्यापारी, दुकानदार लोकांना फसवतात, त्यांची दिशाभूल करतात असे वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपसह व्यापारी संघटनेने नाराजी व्यक्त केली.
view commentsLocation :
Akola,Akola,Maharashtra
First Published :
November 12, 2024 9:33 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Nana Patole : फडणवीसांवर टीका करताना नाना पटोलेंची जीभ घसरली, ''हे स्वत:ला देव समजू लागलेत, पण...''


