Nanded News: नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील मंदिरात आजही जळत्या निखाऱ्यातून चालण्याची प्रथा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Nanded News: पंचक्रोशीतील हजारो भाविक अपरंपार मंदिरात दर्शनासाठी आले होते. जवळपास 12 ते 15 फूट निखारे इथे अंथरलेले होते. त्यावरून भाविक पायात काही न घालता चालत जातात.
नांदेड : जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील महादेव मंदिरात जळत्या निखाऱ्यातून चालण्याची प्रथा आजही पाळली जाते. शेकडो भाविक पायात काही न घालता या निखाऱ्यातून चालतात, धावतात. अर्धापूर तालुक्यातील पाटनूर येथील अपरंपार मंदिरातील हा प्रकार आहे.
महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी रात्री ही प्रथा पाळली जाते.
काल शनिवारी पंचक्रोशीतील हजारो भाविक अपरंपार मंदिरात दर्शनासाठी आले होते. जवळपास 12 ते 15 फूट निखारे इथे अंथरलेले होते. त्यावरून भाविक पायात काही न घालता चालत जातात. लहान मुलेही या निखाऱ्यावरून जात होते. जळत्या निखाऱ्यातून गेल्याने रोगराई दूर होते, संपत्ती प्राप्त होते, मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. भाविकांसाठी ही श्रद्धा असली तरी हा अंधश्रध्देचा प्रकार असल्याचे सांगत अनेकजण टीका करतात.
advertisement
Nanded News: नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील मंदिरात आजही जळत्या निखाऱ्यातून चालण्याची प्रथा pic.twitter.com/GF1fkaGn21
— News18Lokmat (@News18lokmat) March 10, 2024
दरम्यान, तिकडे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे माणुकीला काळीमा फासणारी घटना घडली. विशेषतः जादूटोण्याच्या संशयातून अनेक घटना घडतात, अशीच एक धक्कादायक घटना मुरबाड येथून समोर आली. येथे एका 75 वर्षाच्या वृद्धाला जादूटोण्याच्या संशयातून आगीत नाचवलं.
advertisement
मुरबाड तालुक्यातील करवेळे येथे लक्ष्मण भावार्थे या वृद्ध व्यक्तीला जादूटोणा करतोस, असं म्हणत जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमात काहीजणांनी घरातून उचलून नेऊन पेटत्या निखार्यावर नाचवलं. हा धक्कादायक प्रकार 04 मार्च रोजी रात्रीच्या वेळेस घडला.
वृद्धाच्या पायाला गंभीर स्वरूपाची इजा झाली असून त्यांना त्यावेळेस वेताच्या छडीने मारहाण देखील करण्यात आली आहे. त्यांच्या शरीरावर इतर ठिकाणी गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून दोन्ही पाय निखऱ्याने भाजले आहेत. त्यांच्या घरी डॉक्टरला बोलावून जखमांच्या उपचार केले जात आहेत.
advertisement
मुरबाड तालुक्यामधील करवेळे गावामध्ये गोंधळाच्या कार्यक्रमात जो प्रकार घडला आहे येथे एक इसम जादूटोणा करतो म्हणून तेथील मांत्रिकांनी त्याला पेटत्या निखार्यावर चालवले असून या संदर्भात मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास चालू आहे सदर आरोप हे फार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहे
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
March 10, 2024 5:00 PM IST
मराठी बातम्या/नांदेड/
Nanded News: नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील मंदिरात आजही जळत्या निखाऱ्यातून चालण्याची प्रथा