advertisement

देव तारी त्याला कोण मारी! आईच्या हातातून निसटून रेल्वेखाली गेली 2 वर्षांची चिमुकली, बचावली; कसं पाहा VIDEO

Last Updated:

चिमुकलीला वाचवायला चक्क देवदूतच धावून आला. नाशिक रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली. ही संपूर्ण घटना स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

रेल्वेखाली पडलेली चिमुकली सुखरूप
रेल्वेखाली पडलेली चिमुकली सुखरूप
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी/नाशिक : देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात. याचाच प्रत्यय आला तो नाशकात. एक दोन वर्षांची चिमुकली आईच्या हातून निसटून रेल्वेखाली पडली. पण तिचं नशीब इतकं बलवत्तर की तिला काहीच झालं नाही. कारण चिमुकलीला वाचवायला चक्क देवदूतच धावून आला. नाशिक रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली. ही संपूर्ण घटना स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिक रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आली. गाडीतील प्रवाशांची गाडीतून उतरण्याची आणि प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांची गाडीत चढण्याची घाई होती. अशीच घाईघाईत ट्रेनमधून उतरणारी महिला. जिच्या हातात तिची दोन वर्षांची मुलगी होती. ट्रेनमधून उतरताना मुलगी आईच्या हातातून निसटली ती थेट रेल्वेखाली गेली. रेल्वे रूळांवर ही मुलगी पडली.
advertisement
मुलीला वाचवायला आला 'देवदूत'
मुलगी रेल्वेखाली जाताच लोकांची गर्दी झाली. याचवेळी रेल्वेतून प्रवास करत होते जे जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस फिरोज तडवी. जळगावहून ते नाशिकला ट्रेनने आले होते. त्यांच्यासमोर हा सर्व प्रकार घडला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मुलीला वाचवण्यासाठी धाव घेतली.
ट्रेनला ग्रीन सिग्नल मिळाला होता. ट्रेन सुटणारच होती. तरी आपल्या जीवाची पर्वा न करता फिरोज तडवी रेल्वेच्या खाली गेले आणि त्यांनी त्या मुलीला रेल्वेखालून बाहेर काढलं. मुलीला आईच्या ताब्यात दिलं. तेव्हा कुठे सर्वांच्या जीवात जीव आला. रेल्वे स्टेशनवरील ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
advertisement
पोलिसाचं कौतुक
चिमुकलीसाठी पोलीस फिरोज तडवी देवदूतासारखेच धावून आले. म्हणूनच मृत्यूच्या दारातून ही चिमुकली परत आली.  या कामगिरीबद्दल उपस्थित सर्वांनी पोलीस कर्मचारी फिरोज तडवी यांचं कौतुक करत त्यांना शाबासकीची थाप दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
देव तारी त्याला कोण मारी! आईच्या हातातून निसटून रेल्वेखाली गेली 2 वर्षांची चिमुकली, बचावली; कसं पाहा VIDEO
Next Article
advertisement
Budgetमधील मोठी बातमी, 75 वर्षांत पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले, उद्या काय घडणार?
Budgetमधील मोठी बातमी, पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले
  • यंदाच्या बजेटमध्ये मोठा 'ट्विस्ट'

  • देशाची दिशाच बदलणार

  • 'Part A' नाही तर 'Part B' करणार धमाका

View All
advertisement