Shirdi Airport : 'शिर्डी विमानतळ जप्त करा', निघालं वॉरंट; पण कुणी आणि का बजावलं?

Last Updated:

साईभक्तांच्या सुविधेसाठी शिर्डीपासून 15 किमी अंतरावर असलेल्या काकडी गावात विमानतळ उभारण्यात आलं. पण आता या विमानतळाच्या जप्तीचं वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

शिर्डी विमानतळ (फाइल फोटो)
शिर्डी विमानतळ (फाइल फोटो)
अहमदनगर : साईबाबांच्या दर्शनासाठी देशविदेशातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी शिर्डीपासून 15 किमी अंतरावर असलेल्या काकडी गावात विमानतळ उभारण्यात आलं. पण आता या विमानतळाच्या जप्तीचं वॉरंट जारी करण्यात आलं आहे. शिर्डी विमानतळ विकास प्राधिकरणाला काकडी ग्रामपंचायतीनं जप्तीचं वॉरंट बजावलं आहे.
शिर्डी विमानतळाची उभारणी करताना गावातील हजारो हेक्टर जमिनीचं भूसंपादन करण्यात आलं. त्यावेळी काकडी गावात पायाभूत सुविधा आणि ग्रामविकासाठी निधी देण्याचं आश्वासन महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास प्राधिकरणानं दिलं होतं. काकडी गावच्या ग्रामस्थांनी गावचा विकास होईल, तरुणांना रोजगार मिळेल या आशेने आपली शेतजमीन कवडीमोल दराने विमानतळासाठी दिली आहे. पण आता हेच विमानतळ जप्त होण्याची शक्यता आहे.
advertisement
कोण जप्त करणार शिर्डी एअरपोर्ट?
ज्या ठिकाणी हे विमानतळ आहे त्या काकडी ग्रामपंचायतीनेच विमानतळ जप्त करण्याची नोटीस बजावली आहे. ग्रामपंचायतने कलम 129 नुसार विमानतळाच्या मालमत्ता जप्तीचे वाॅरंट जारी केलं आहे. विमातळाची टर्मिनल बिल्डिंग, पेट्रोल पंप, एटीसी टॉवरसह मालमत्ता जप्तीचं वॉरंट ग्रामपंचायतीने बजावलं आहे.
advertisement
का जप्त केलं जाणार शिर्डी विमानतळ?
गावाचा विकास सोडा विमानतळ प्राधिकरणाने गेल्या आठ वर्षापासून ग्रामपंचायतचा कर थकवला आहे. विमानतळ प्राधिकरणाने 8 कोटी 30 लाखांचा कर थकवला आहे. कर थकल्याने गावातील विकासाला अडथळे निर्माण होतात. अनेकदा निवेदनं दिली गेली, नोटीस पाठवली गेली. मात्र अजूनही थकबाकी दिली नाही. विमानतळ प्राधिकरण, मुख्यमंत्री , पालकमंत्री तसंच शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा करूनही कराची रक्कम जमा होत नसल्याने अखेर ग्रामपंचायतीने जप्तीची नोटीस धाडली आहे, असं काकडी गावच्या सरपंच पूर्वा गुंजाळ यांनी दिली आहे.
advertisement
ग्रामपंचायतचा थकवलेला 8.30 कोटी रूपये कर न भरल्यास शिर्डी विमानतळाची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. आता विमानतळ प्राधिकरण थकबाकी भरणार का? राज्य सरकार या नोटीसीची दखल घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Shirdi Airport : 'शिर्डी विमानतळ जप्त करा', निघालं वॉरंट; पण कुणी आणि का बजावलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement