महाराष्ट्रातील असं गाव जिथे घरोघरी पाळले जातात विषारी साप; कोब्राही मोकळेपणाने घरात फिरतात

Last Updated:

इथं माणूस ना सापांना इजा करतात ना साप माणसांना इजा पोहोचवतात. दोघेही एकमेकांसोबत राहतात, एकमेकांना घाबरत नाहीत

घरात राहतात साप (प्रतिकात्मक फोटो)
घरात राहतात साप (प्रतिकात्मक फोटो)
सोलापूर : सापाचं नाव काढलं तरी आपल्यापैकी अनेकांचा थरकाप उडतो. अशात साप समोर आला तर काय अवस्था होईल, याची कल्पना करणंही भीतीदायक आहे. मात्र, महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील असं एक गाव आहे, तिथे लोक सापांचं चक्क घरामध्ये मोकळ्या मनाने स्वागत करतात. येथे लोकांच्या घराचे दरवाजे सापांसाठी नेहमीच उघडे असतात. सोलापूर जिल्ह्यात शेतपाळ नावाचं हे गाव आहे.
त्या गावातील प्रत्येक घरात खुलेआम साप फिरत असतात. दरम्यान इतर ठिकाणी आपल्या घरात साप आलेल पाहून लोक घाबरतात, पंरतु या गावात लोक सापांचे स्वागत करतात आणि तेही किंग कोब्रा! याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. या गावात नाग प्रत्येक घरात मोकळेपणाने फिरत असून त्यांना कोणीही अडवत नाही.
advertisement
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या 2018 च्या रिपोर्टनुसार, या गावातील 2600 हून अधिक ग्रामस्थ नागाची पूजा करतात. इथं माणूस ना सापांना इजा करतात ना साप माणसांना इजा पोहोचवतात. दोघेही एकमेकांसोबत राहतात, एकमेकांना घाबरत नाहीत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, येथे माणसाला साप चावल्याची एकही घटना घडलेली नाही. इथल्या घरांव्यतिरिक्त शाळेच्या वर्गातही साप येतात, पण मुले सापांमध्येच वाढलेली असल्याने त्यांना अजिबात भीती वाटत नाही. येथे आपले नवीन घर बांधणारे लोक सापांसाठी एक छोटा कोपरा बनवतात ज्याला देवस्थानम असे नाव दिले जाते.
advertisement
ज्या घरात साप येऊन बसतात त्या प्रत्येक घरात हा कोपरा असतो. सापांसोबत राहण्याची ही प्रथा कधी आणि कशी सुरू झाली हे कोणालाच माहीत नाही, पण आता सापही इथल्या लोकांच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. इथे बाहेरचा माणूस आला तर त्याला भीती वाटणे साहजिक आहे. अशा स्थितीत अंडी, दूध आणि नशीब सोबत आणावे, असा सल्ला येथील लोकांनी दिला आहे.
मराठी बातम्या/Viral/
महाराष्ट्रातील असं गाव जिथे घरोघरी पाळले जातात विषारी साप; कोब्राही मोकळेपणाने घरात फिरतात
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement