NHIDCL Bharti: एनएचआयडीसीएलमध्ये 1 लाख 50 पगारासाठी नोकरीची सुवर्णसंधी, उपव्यवस्थापक पदासाठी होतेय भरती

Last Updated:

नॅशनल हायवे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने 2025 मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीमध्ये एकूण 34 रिक्त पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. हे अर्ज उपव्यवस्थापक (तांत्रिक संवर्ग) या पदांसाठी आहेत.

News18
News18
नॅशनल हायवे आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे 2025 कंपनीमध्ये उपव्यवस्थापक (तांत्रिक संवर्ग) पदासाठी नोकरभरतीची घोषणा करण्यात आली आहे. एनएचआयडीसीएल कंपनीमध्ये उपव्यवस्थापक पदासाठी 34 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी आणि 2023, 2024 किंवा 2025 मधील वैध गेट (GATE) गुण असलेले पात्र उमेदवार 4 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेल्या नोकरभरतीचा शेवटचा दिवस 3 नोव्हेंबर 2025 पर्यंतचा आहे.
उमेदवारांची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होत असून अर्ज शुल्क पद्धतही ऑनलाईन पद्धतीनेच केले जात आहे. उमेदवारांची निवड गेट परीक्षेतील गुणांवर आधारित केली जाणार आहे. भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव उपव्यवस्थापक (तांत्रिक संवर्ग) असे आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीमध्ये एकूण 34 रिक्त जागा आहेत. या रिक्त पदांसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता अनिवार्य आहे. पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन 50,000 ते 1,60,000 पर्यंतचे वेतन वेतनश्रेणीनुसार दिले जाणार आहे. ही वेतनश्रेणी नियमांनुसार लागू होईल. शिवाय, इतरत्र -भत्तेही उमेदवारांना देण्यात येणार आहे.
advertisement
एनएचआयडीसीएल कंपनीमध्ये उपव्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे विशिष्ट शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून सिव्हिल इंजीनियरिंगमधे पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, उमेदवारांनी GATE (सिव्हिल इंजिनिअरिंग) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ही परीक्षा 2023, 2024 किंवा 2025 यापैकी कोणत्याही एका वर्षात उत्तीर्ण असणे बंधन कारक आहे. समान GATE गुण असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत, निवड जन्मतारखेच्या काल क्रमानुसार केली जाणार आहे. यामध्ये सर्वात ज्येष्ठ उमेदवाराला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
advertisement
जर, उमेदवारांची जन्मतारीख देखील समान असेल, तर त्यांची निवड त्यांच्या दहावीच्या प्रमाणपत्रावर दिसणार्‍या पहिल्या नावाच्या वर्णक्रमानुसार केली जाणार आहे. उपव्यवस्थापक पदावरील उमेदवारांच्या जबाबदार्‍यांमध्ये सिव्हिल इंजिनियरिंग प्रकल्पांचे नियोजन, डिझाइन, अंमलबजावणी आणि निरीक्षण यांचा समावेश आहे. हे प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग, धोरणात्मक रस्ते, बोगदे आणि पायाभूत सुविधांशी संबंधित असतील. त्यांना सरकारी धोरणे आणि मानकांचे पालन सुनिश्चित करणे आवश्यक आहे. तसेच, सक्षम प्राधिकरणाने सोपवलेली इतर कोणतीही कामे त्यांना करावी लागतील.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NHIDCL Bharti: एनएचआयडीसीएलमध्ये 1 लाख 50 पगारासाठी नोकरीची सुवर्णसंधी, उपव्यवस्थापक पदासाठी होतेय भरती
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement