शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे सेक्युलर राजे होते, नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
- Published by:Prachi Amale
Last Updated:
आमच्या आई वडीलांपेक्षा आमच्या मनात शिवाजी महाराज यांचं स्थान मोठं आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.
मुंबई : शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे सेक्युलर राजे होते. जात-पात-धर्म-पंथानं व्यक्ती मोठा होत नाही तर पराक्रमानं होतो, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्त्व पूर्णांग होतं, आपण अपूर्ण आहोत, असेही नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले, आमच्या मनात शिवाजी महाराजांचं स्थान मोठं आहे. छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्त्व पूर्णांग होतं, आपण अपूर्ण आहोत. जात-पात-धर्म-पंथानं व्यक्ती मोठा होत नाही तर पराक्रमानं होतो. शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिकही होते. शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे सेक्युलर राजे होते. काही शिकायचं असेल, प्रेरणा घ्यायची असेल तर शिवाजी महाराज... महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता त्यांचं कार्य जगभर जायला हवं..
advertisement
छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवनचरित्र इंग्रजीत येतंय ही आनंदाची बातमी आहे. शिवाजी महाराज यांच्या कार्याबाबत अनेकांच्या मनात गैरसमज होते. आमच्या आई वडीलांपेक्षा आमच्या मनात शिवाजी महाराज यांचं स्थान मोठं आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले, वेळप्रसंगी शिवाजी महाराज यांनी मुलाला शिक्षा करायला मागे पुढे पाहिलं नाही. नाहीतर राजकारणात आजकाल सगळे आपली मुलं, मुली आणि पत्नी यांना तिकीट मागतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व पूर्णांग होत, आपण अपूर्ण आहोत. जात पात धर्म पंथ याने व्यक्ती मोठा होत नाही तर पराक्रमाने मोठा होतो.. शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक देखील होते. काही शिकायचं असेल, प्रेरणा घ्यायची असेल तर शिवाजी महाराजांकडून घ्यायला पाहिजे.
advertisement
अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची प्रतापगडावर भेट झाली तेव्हा शिवजी महाराज यांच्यावर अफजल खान याने वार केला तेंव्हा शिवाजी महाराज यांनी अफजल खानचा वध झाला. त्यानंतर शिवाजी महाराज यांनी आदेश दिला की सन्मानाने याची कबर झाली पाहिजे. सेक्युलर शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीत अर्थ सर्व धर्म समभाव आहे. सर्व धर्माच्या सोबत समान न्याय करणे हा सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर राजे होते. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने माघारी पाठवलं, असेही नितीन गडकरी म्हणाले,
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 02, 2025 9:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे सेक्युलर राजे होते, नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य