Mahadev Jankar : बारामती की परभणी? महादेव जानकर कोणत्या मतदारसंघात लढणार? राष्ट्रवादीनेच केली घोषणा
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Mahadev Jankar : रासप प्रमुख महादेव जानकर कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी याची घोषणा केली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून आता उमेदवार जाहीर करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. रासपचे नेते महादेव जानकर नुकतेच महायुतीत सहभागी झालेत. यानंतर जानकर नेमके कुठून लढणार? याची चर्चा सुरू झाली. सुनेत्रा पवार यांच्याऐवजी महादेव जानकर बारामतीतून लढणार की परभणीतून उभे राहणार? याची उत्सुकता होती. कालपर्यंत भाजपने धोका दिल असं सांगणारे महादेव जानकर मविआच्या दारातून पुन्हा महायुतीत आले आहेत. आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनीच महादेव जानकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी महादेव जानकरही उपस्थित होते.
महादेव जानकरांचा मतदारसंघ ठरला
सुनिल तटकरे म्हणाले, रायगड आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांनी आधीच उमेदवारी जाहिर केली आहे. महायुतीच्या बैठकीत परभणीची जागा ही राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. या जागेवर महादेव जानकर हे आमचे उमेदवार असतील. राष्ट्रीय समाज पक्षाला राष्ट्रवादीनं ही जागा दिली आहे. महादेव जानकर हे परभणीचे महायुतीचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. परभणी जिल्ह्यातल्या सहकार्यांशी आम्ही सर्वांनी चर्चा केली. महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्ष आणि पक्षचिन्हाकडूनच परभणीची जागा लढणार आहेत.
advertisement
रायगड लोकसभेत भाजपची भूमिका काय?
भाजप नेता आणि कार्यकर्त्यांच्या काही मागण्या होत्या. त्या मंत्री रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऐकल्या आहेत. रायगड आणि 48 मतदारसंघासंदर्भात आम्ही जोरदार काम करत आहोत. रायगडमध्ये उद्या माझी बैठक होईल आणि एकत्रित आम्ही परवापासून सुरुवात करणार आहोत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती काल बैठक झाली आहे. आता माझी जबाबदारी राहील. सर्व घटक पक्षांची बैठक करुन सुरुवात करायची आहे.
advertisement
कनिष्ठ पातळीवर जे निर्णय झालेत त्यासंदर्भात घोषणा होतील. आज उद्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि माझी एक पुन्हा बैठक होईल. त्यात सर्व चित्र स्पष्ट होईल. माझी आणि आढळराव पाटील यांच्या नावाची घोषणा पहिल्या यादीत अजित पवार यांनी केली होती, अशी माहिती सुनिल तटकरे यांनी दिली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2024 4:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/परभणी/
Mahadev Jankar : बारामती की परभणी? महादेव जानकर कोणत्या मतदारसंघात लढणार? राष्ट्रवादीनेच केली घोषणा









