दिवाळीच्या सुट्टीत लेकरांनाा इथं नक्की घेऊन जा, बीडमधील हे ठिकाण आहे बेस्ट!

Last Updated:

बीड जिल्ह्यातील संतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या गोरक्षनाथ टेकडी हे ठिकाण धार्मिक आणि पर्यटन या दोन्ही दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ हवा आणि शांत परिसरामुळे हे ठिकाण प्रवाशांना मनःशांती देणारं ठरतं.

+
देवाच्या

देवाच्या सुट्ट्यांमध्ये फिरायचं प्लॅन करताय ? हे स्थळ ठरेल तुमच्यासाठी खास

बीड जिल्ह्यातील संतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या गोरक्षनाथ टेकडी हे ठिकाण धार्मिक आणि पर्यटन या दोन्ही दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ हवा आणि शांत परिसरामुळे हे ठिकाण प्रवाशांना मनःशांती देणारं ठरतं. त्यामुळेच दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर गोरक्षनाथ टेकडी तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये नक्की असावी.
गोरक्षनाथ टेकडी ही बीड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आध्यात्मिक स्थळ आहे. येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी आणि समाधीस्थळ पाहण्यासाठी भेट येतात. या टेकडीवरून संपूर्ण परिसराचे मनोहारी दृश्य दिसते. सकाळच्या सूर्यकिरणांमध्ये आणि संध्याकाळच्या प्रसन्न वातावरणात या ठिकाणी फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो. याच कारणामुळे केवळ धार्मिक श्रद्धा नव्हे, तर निसर्गप्रेमींनाही हे ठिकाण आकर्षित करतं. या परिसरात प्रशासनाने आकर्षक बाग- बगीचा, बसण्यासाठी जागा, तसेच भाविक आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
advertisement
टेकडीच्या आजूबाजूला हिरवळ, फुलांचे ताटवे आणि स्वच्छ वातावरण यामुळे पर्यटकांना इथे येताना वेगळाच अनुभव मिळतो. लहान मुलांसाठी तसेच कुटुंबांसाठी हे ठिकाण एक दिवसाच्या पिकनिकसाठी आदर्श मानले जाते. गोरक्षनाथ टेकडीला भेट देताना श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. भक्तीभावाने दर्शन घेतल्यानंतर निसर्गाच्या कुशीत थोडा वेळ घालवणे ही मन:शांती देणारी अनुभूती ठरते. स्थानिक नागरिकांसाठीही ही टेकडी अभिमानाचं ठिकाण आहे. त्यामुळे या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तुमच्या कुटुंबासह आणि मित्रांसह या पवित्र तसेच रमणीय स्थळाला एकदा तरी नक्की भेट द्या.
advertisement
गोरक्षनाथ टेकडी ही फक्त धार्मिक ठिकाण नसून बीड जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावरील एक उज्ज्वल ठिकाण बनत चालली आहे. निसर्ग, श्रद्धा आणि शांती या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे दिवाळीच्या आनंदात भर घालण्यासाठी गोरक्षनाथ टेकडीची सफर एक उत्तम आणि संस्मरणीय अनुभव ठरेल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दिवाळीच्या सुट्टीत लेकरांनाा इथं नक्की घेऊन जा, बीडमधील हे ठिकाण आहे बेस्ट!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement