बारामतीसाठी खुले मैदान, इंदापूरला SC, पुण्याच्या १३ पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षण जाहीर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Pune District Panchayat Samiti Sabhapati Reservation: पुणे जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत ९ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली.
पुणे : गेल्या तीन चार वर्षांपासून पंचायत समिती निवडणुकीची वाट पाहणाऱ्या गाव पुढाऱ्यांची प्रतिक्षा संपलेली असून जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतीपदांचे आरक्षणही जाहीर करण्यात आले. त्यानुसार राज्यातील सर्वाधिक चर्चेत बारामती पंचायत समितीचे सभापतीपदाचे मैदान खुले असेल तर इंदापूर पंचायत समिती ही अनुसूचित जातीसाठी राखीव असेल.
पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता, बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली. सभापती पदाकरिता सोडत अडीच वर्ष कालावधीकरिता असेल.
कोणती पंचायत समितीत कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित?
इंदापूर- अनुसूचित जाती
जुन्नर-अनुसूचित जमाती महिला
advertisement
दौंड-नागरिकांचा मागास प्रवर्ग
पुरंदर-नागरिकांचा मागास प्रवर्ग
शिरूर-नागरिकांचा मागासवर्ग महिला
मावळ-नागरिकांचा मागासवर्ग महिला
वेल्हे-सर्वसाधारण महिला
मुळशी-सर्व साधारण महिला
भोर-सर्वसाधारण महिला
खेड-सर्वसाधारण महिला
हवेली-सर्वसाधारण
बारामती-सर्वसाधारण
आंबेगाव-सर्वसाधारण
गेल्या तीन-चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता निवडणूक होणार, नंतर होणार असे म्हणत गेली दोन वर्षे सरली. परंतु ओबीसी आरक्षणाचा घोळ मिटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरीस पूर्ण होणे बंधनकारक आहेत. डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या आरक्षणाची सोडत आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 09, 2025 3:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बारामतीसाठी खुले मैदान, इंदापूरला SC, पुण्याच्या १३ पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षण जाहीर