महाडच्या मनसे शहर अध्यक्षाला बेदम मारहाण, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप, रायगडमध्ये काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत महाडचे मनसे शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.या मारहाणीनंतर उमासरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Raigad News : रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत महाडचे मनसे शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.या मारहाणीनंतर उमासरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उमासरे यांना झालेली ही मारहाण उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडून केल्याचा आरोप होत आहे.तसेच मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या विरोधात बोलल्याने त्यांना मारहाण झाल्याचा संशय व्यक्त होतोय. या प्रकरणी अद्याप तरी मनसेकडून कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही आहे. पण या घटनेने रायगडमध्ये खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, महाडचे मनसे शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांनी एका व्हिडिओत मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या विरोधात वैयक्तिक टीका केली होती. या टीकेचा व्हिडि देखील व्हायरल झाला होता.या व्हिडिओनंतर पंकज उमासरे यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. मंत्री गोगावले यांच्या विरोधात मुलाखत दिल्यामुळे ही मारहाण झाल्याची संशय व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement
पंकज उमासरे यांना शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी गाठले आणि त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप होतो आहे. ही मारहाण इतकी गंभीररित्या करण्यात आली होती की उमासरे यांना धड चालताही येत नव्हते. या घटनेनंतर उमासरे यांच्यावर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ह्या सर्व प्रकारामुळे महाडचे राजकिय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पहायला मिळत आहे
advertisement
या प्रकरणात अद्याप तरी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही आहे.पण या घटनेने रायगडमध्ये खळबळ माजली आहे.
view commentsLocation :
Raigad,Maharashtra
First Published :
November 01, 2025 11:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाडच्या मनसे शहर अध्यक्षाला बेदम मारहाण, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप, रायगडमध्ये काय घडलं?


