Raj Thackeray : मेळाव्याआधी मनसेतील धुसफूस बाहेर, राज ठाकरेंच्या खास नेत्याच्या पोस्टरला फासलं काळं

Last Updated:

Raj Thackeray MNS Melava : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढी पाडवा मेळावा पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर, दुसरीकडे पक्षातील अंतर्गत धुसफूस बाहेर पडली आहे.

News18
News18
पालघर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढी पाडवा मेळावा पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर, दुसरीकडे पक्षातील अंतर्गत धुसफूस बाहेर पडली आहे. राज ठाकरे यांच्या खास शिलेदाराच्या बॅनरवरील फोटोला काळं फासण्यात आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पालघर मधील मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मनसैनिकांना गुढीपाडवा मेळाव्यासाठी आवाहन करणाऱ्या बॅनरवरील मनसे नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला काळं फासण्यात आले आहे. पालघरच्या बोईसर मधील ओसवाल परिसरात लागलेल्या बॅनरवरील फोटोला काळं फासण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
अविनाश जाधव यांच्या फोटोला पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी काळ फासल्याची माहिती समोर आली आहे. मनसे नेते अविनाश जाधव आणि पालघर मधील मनसैनिकांमध्ये असलेला वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. अविनाश जाधव यांच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वी स्थानिक मनसैनिकांनी आक्षेप घेतले होते. मात्र, स्थानिक मनसैनिकांमध्ये जाधवांबद्दल असलेला रोष अद्याप कमी झाला नसल्याची चर्चा रंगली आहे.
advertisement

राज ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष...

राज ठाकरे यांनी पक्षात संघटनात्मक पातळीवर बदल करण्यास सुरुवात केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीतही पक्षाला अपयशाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पुन्हा भरारी घेण्यासाठी मनसेने आता कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कोणती घोषणा करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray : मेळाव्याआधी मनसेतील धुसफूस बाहेर, राज ठाकरेंच्या खास नेत्याच्या पोस्टरला फासलं काळं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement