...तर गाठ माझ्याशी आहे, ठाकरेंच्या शिलेदाराने मराठी तरुणाला मारणाऱ्या भैय्याला धडा शिकवला
- Published by:Akshay Adhav
- Reported by:AJIT MANDHARE
Last Updated:
मराठीचा मुद्दा चर्चेत असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांनी एका परप्रांतीय तरुणाला कान पकडून मराठी तरुणाची माफी मागायला लावलेली आहे.
अजित मांढरे, ठाणे : मराठीच्या मुद्द्यावरून राज्यभर आंदोलन उभे केले गेले. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याने राज्य सरकारला हिंदी सक्तीचा जीआर मागे घ्यायला लागला. सरकारने एक पाऊल मागे घेतल्यानंतर दोन्ही पक्षांकडून विजय रॅलीचे आयोजन केले गेले आहे.
मराठीचा मुद्दा चर्चेत असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांनी एका परप्रांतीय तरुणाला कान पकडून मराठी तरुणाची माफी मागायला लावलेली आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात काही दिवसांपूर्वी एका मराठी तरुणाला काही परप्रांतीय तरुणांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती. या मराठी तरुणाला हे परप्रांतीय तरुण वारंवार त्रास देत होते. याबाबत या मराठी तरुणाने माजी खासदार राजन विचारे त्यांच्याकडे तक्रार केली होती.
advertisement
त्यानंतर राजन विचारे यांनी त्या दुकानदाराला आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. जर महाराष्ट्रात अशा रीतीने मराठी तरुणांना त्रास दिला, मारहाण केली तर तुम्हाला त्यात भाषेत उत्तर दिले जाईल, इथे तुम्ही पोट भरायला येता. आम्ही तुम्हाला सर्व काही देतो, असे असूनही जर तुम्ही अशा रितीने मराठी तरुणांशी, मराठी लोकांशी वागत असाल तर तुमची गाठ माझ्याशी आहे, असा इशारा देऊन कान पकडून आमच्या पोराची जाहीररित्या माफी माग, असे सुनावले.
advertisement
मराठी तरुणाला परप्रांतियांनी दुकानदारांनी मारहाण केलेली घटना ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढेल झाली होती आणि त्याचे पडसाद हिंदू लागले होते तोच राजे विचारे यांनी त्या दोन परप्रांतीय दुकानदारांना धडा शिकवला
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
July 02, 2025 9:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
...तर गाठ माझ्याशी आहे, ठाकरेंच्या शिलेदाराने मराठी तरुणाला मारणाऱ्या भैय्याला धडा शिकवला


