भटक्या विमुक्तांच्या रेशनिंगसंदर्भात महसूलमंत्र्यांचा मोठा निर्णय, १५ प्रश्न झटक्यात सोडवले

Last Updated:

Chandrashekhar Bawankule: भटक्या समाजातील लोकांच्या अडचणी समजून घेऊन १५ प्रश्न तातडीने मार्गी लावले आहेत, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : भटके विमुक्त समाजाला जात प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनिंगकार्डसह विविध दाखले देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करावे. तसेच या समाजाला राज्यात कुठेही रेशनिंग दुकानातून धान्य उपलब्ध होईल अशाप्रकारे १५ मागण्यांबाबतचे निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले.
भटके विमुक्त समाजातील विविध प्रश्नांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आलेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. बैठकीला भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे यांच्यासह राज्यातील भटके विमुक्त समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भटक्या समाजातील लोकांच्या अडचणी समजून घेऊन १५ प्रश्न तातडीने मार्गी लावले आहेत. गतवर्षी भटक्या समाजाच्या तांड्यावर दिवाळी साजरी केली होती. त्यांच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावला. त्यामुळे राज्यभरात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या गायरान जमीनीवर भटके समाजाची वस्ती आहे. याबाबत पंधरा दिवसात आराखडा सादर करावा. त्यांचाही प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात येईल.
advertisement
advertisement

भटक्या समाजासाठी घेण्यात आलेले निर्णय-

जात प्रमाणपत्र गृहभेटी आधारावर देण्यात येणार
शाळा, महाविद्यालयात मंडणगड पँटर्नप्रमाणे जात दाखले द्यावेत
१९६१ पूर्वीचे जात कागदपत्र नसणाऱ्यांना गृहचौकशी आधारे जात प्रमाणपत्र द्यावे
भटकंती करणाऱ्या व्यक्तींना नायब तहसिलदारामार्फत ओळखपत्र द्यावे
विविध दाखले देण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात यावे
१९५२ चा सवयीचा गुन्हेगार कायदा रद्द करण्याबाबत प्रस्ताव द्यावा
advertisement
आधारकार्डसाठी कागदपत्रांचा पर्याय देण्यात यावा
तात्पुरते रेशनकार्ड देण्याऐवजी कायमस्वरुपी देण्यात यावे
सरकारी किंवा खासगी जमीनीवर वसलेल्या भटके समाजाचे सर्वेक्षण करावे
भटक्या समाजाला रेशनकार्ड देण्यात यावे
भटक्या समाजाचे जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात येणार
जागा वाटपासाठी वस्तीनिहाय यादी सादर करावी
अन्याय अत्याचार प्रतिबंधक व संरक्षण समितीची स्थापना करुन तिची बैठक घेणार
भटके विमुक्तांना कसण्यासाठी पट्टे उपलब्ध करुन देणार
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भटक्या विमुक्तांच्या रेशनिंगसंदर्भात महसूलमंत्र्यांचा मोठा निर्णय, १५ प्रश्न झटक्यात सोडवले
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement