Rohit Pawar Ajit Pawar : राष्ट्रवादीत चाललंय काय? काकाच्या स्वागतासाठी पुतण्याची बॅनरबाजी, चर्चांना उधाण
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ajit Pawar Rohit Pawar : राष्ट्रवादीतील आणखी एक घडामोड समोर आली आहे. काका अजित पवार यांच्या दौऱ्याच्या स्वागताचे बॅनर पुतण्या रोहित पवारच्या समर्थकांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे, याची चर्चा रंगली आहे.
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी, अहिल्यानगर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर लोकसभा-विधानसभा निवडणुका पार पडल्या. या दोन निवडणुकानंतर राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतात. मात्र, दोन्ही गटांकडून या चर्चांना पूर्ण विराम लावण्याचा प्रयत्न केला जातो. काही दिवसांपूर्वी चुलत्याच्या आशिर्वादाने बरं चाललंय असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यानंतर काका-पुतण्याच्या जवळीकीबाबत तर्क लावण्यास सुरुवात झाली होती. आता राष्ट्रवादीतील आणखी एक घडामोड समोर आली आहे. काका अजित पवार यांच्या दौऱ्याच्या स्वागताचे बॅनर पुतण्या रोहित पवारच्या समर्थकांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे, याची चर्चा रंगली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज कर्जत-जामखेड दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर हा त्यांचा या मतदारसंघातील पहिलाच दौरा आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलीस स्टेशन रोडवर लागलेला एक बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. "कर्जत-जामखेडच्या पावन भूमीत सहर्ष स्वागत, स्वागतोत्सुक आमदार रोहित दादा पवार मित्रपरिवार आणि समस्त कर्जत जामखेडकर" असा मजकूर असलेला हा बॅनर रोहित पवार यांच्या नावाने लावण्यात आला आहे.
advertisement

राष्ट्रवादीत झालेल्या फाटाफुटीनंतर रोहित पवार हे शरद पवार यांच्या गटात सक्रिय आहेत. अजित पवार यांच्याशी राजकीय मतभेद स्पष्ट आहेत. अशा स्थितीत रोहित पवार यांच्या नावाने अजित पवार यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेला बॅनर अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरत आहे. मागील काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार हे देखील एकत्र विविध बैठकीच्या निमित्ताने दिसून आले होते. त्यानंतर रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात जवळीक असल्याची चर्चा सुरू झाली होती.
advertisement
रोहित पवार जाणार काकांसोबत?
राष्ट्रवादी शरद पवार गटात रोहित पवार यांना डावललं जात असल्याची चर्चा सुरू होती. रोहित पवार यांना पक्षात तूर्तास मोठी जबाबदारी देण्यात आली नाही. त्याशिवाय, त्यांना जयंत पाटील यांच्यासोबत असलेल्या कथित वादामुळे शरद पवार रोहित पवारांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर रोहित पवार हे अजित पवार यांच्यासोबत जाणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
view commentsLocation :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
April 17, 2025 8:31 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rohit Pawar Ajit Pawar : राष्ट्रवादीत चाललंय काय? काकाच्या स्वागतासाठी पुतण्याची बॅनरबाजी, चर्चांना उधाण


