Transport: ओला, उबर, रॅपिडोचं भाडं कमी होणार! काय सांगते आरटीओची नवीन नियमावली?

Last Updated:

Transport: ओला आणि उबरसारखे अ‍ॅप प्रवाशांकडून जास्त भाडे घेऊन चालकांना मात्र कमी पैसे देतात.

Transport: ओला, उबर, रॅपिडोचं भाडं कमी होणार! काय सांगते आरटीओची नवीन नियमावली?
Transport: ओला, उबर, रॅपिडोचं भाडं कमी होणार! काय सांगते आरटीओची नवीन नियमावली?
मुंबई: महानगरी मुंबईसह आजूबाजूच्या उपनगरांनध्ये प्रवास करण्यासाठी अनेकजण ओला, उबर, रॅपिडोसारख्या अ‍ॅप्सची सेवा घेतात. हे अ‍ॅग्रीगेटर्स गेल्या काही काळापासून प्रवाशांकडून जास्त भाडं घेऊन चालकांना कमी मोबदला देत असल्याचे प्रकार घडत होते. यावर आता कारवाई करण्यात आली आहे. निश्चित दर ठरवून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश परिवहन विभागाने अ‍ॅग्रीगेटर्सला दिले आहेत. आजपासून (23 सप्टेंबर) ओला, उबर, रॅपिडोचे कॅबचालक सरकारी नियमाप्रमाणे प्रवासी दर आकारणार आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ओला आणि उबरसारखे अ‍ॅप प्रत्यक्ष चालकांना एका किलोमीटरसाठी 8 ते 9 रुपये देतात. इतर वाहतूक खर्च जास्त असल्याने चालकांचं यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं होतं. याबाबत अ‍ॅप आधारित टॅक्सी चालकांनी संप केले, आंदोलने केली आणि शासनाशी पत्रव्यवहार देखील केला होता. फक्त चालकांचीच नाहीतर या कंपन्यांकडून प्रवाशांची देखील आर्थिक लूट होत होती.
advertisement
त्यामुळे आता अ‍ॅग्रीगेटर्स देखील सामान्य रिक्षा आणि कॅब यासाठी आरटीओने निश्चित केलेले दर लागू होणार आहेत. साध्या टॅक्सीसाठी प्रतिकिलोमीटर 20.66 रुपये आणि एसी टॅक्सीसाठी प्रतिकिलोमीटर 22.72 रुपये दर असेल. या दरांचं पालन न केल्यास परिवहन विभागाद्वारे कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
advertisement
ओला, उबर, रॅपिडो कंपन्यांना प्रत्येक वाहन फेरीद्वारे गोळा केलेल्या भाड्याच्या किमान 80 टक्के रक्कम चालकांना देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हॅचबॅक गाड्यांसाठी प्रतिकिलोमीटर 28 रुपये, सेडान गाड्यांसाठी प्रतिकिलोमीटर 31 रुपये आणि एसयुव्ही म्हणजेच मोठ्या गाड्यांसाठी प्रतिकिलोमीटर 34 रुपये आकारण्याची परवानगी आहे. कंपन्यांनी हे नियम न पाळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Transport: ओला, उबर, रॅपिडोचं भाडं कमी होणार! काय सांगते आरटीओची नवीन नियमावली?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement