Pune Double Decker Bus : हिंजवडी-मगरपट्ट्यातील प्रवाशांसाठी गूड न्यूज! PMPMLच्या डबल डेकर बस सुरू; कसा आणि कुठून असेल मार्ग?

Last Updated:

Pune Double Decker Bus : पुण्यातील हिंजवडी आणि मगरपट्टा परिसरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी PMPML तर्फे 10 डबल डेकर बसेस मार्गावर येणार आहेत. या बसेस आयटी पार्कांतील प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरतील.

News18
News18
पुणे : पुण्यातील हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा परिसरातील आयटी हबमध्ये दररोजची वाहतूक कोंडी कर्मचारी आणि कंपन्यांसाठी मोठी अडचण ठरत आहे. या मार्गांवर रस्त्यावरच्या गर्दीमुळे हजारो कामगार वेळेवर ऑफिसला पोहोचू शकत नाहीत तर कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत समस्या येत आहेत. अशा परिस्थितीत पुणे महानगर परिवहन महामंडळाने सुरू केलेली डबल डेकर बसची चाचणी यशस्वी ठरल्याचे समोर आले आहे.
आठवडाभर चाललेल्या या टेस्ट रनमध्ये हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा परिसरातील रस्त्यांची तपासणी करून बस मार्गांचा अभ्यास केला गेला. आयटी पार्कमधील चार मार्गांवर बस चालवण्याची चाचणी यशस्वी झाली तसेच देहू–आळंदी मार्ग हा पाचवा मार्गही निश्चित करण्यात आला आहे. यामुळे येत्या दिवाळीपर्यंत पुण्यातील डबल डेकर बसची सेवा सुरू होण्याची शक्यता उघड झाली आहे.
advertisement
शहरात 10 डबल डेकर बसचा समावेश
पीएमपीच्या नियोजनानुसार येत्या दिवाळीपर्यंत 10 डबल डेकर बसेस तातडीने ताफ्यात दाखल करण्याची तयारी सुरू आहे. या बसेस मुख्यतहा आयटी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना लक्षात घेऊन चालवल्या जाणार आहेत. यामुळे पुण्यातील गर्दी आणि वाहतूक कोंडीतील समस्या काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी सांगितले की, हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा परिसरातील वाहतूक ही कर्मचारी आणि कंपन्यांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय होती. डबल डेकर बसेस या समस्येवर उपाय ठरू शकतात. त्यांनी असेही स्पष्ट केले की,आयटी पार्कमधील चार मार्गांसोबत देहू–आळंदी हा पाचवा मार्गही बससेवेसाठी निश्चित केला गेला असून येत्या दिवाळीपासून प्रवाशांना या बसांचा लाभ मिळू शकतो.
advertisement
या डबल डेकर बसच्या मार्गांमध्ये काही ठळक प्रवासी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत:
हिंजवडी फेज 1 ते फेज 3: आयटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा मार्ग, ज्यामुळे हिंजवडी परिसरातील लोकांना सोयीस्कर प्रवास मिळणार आहे.
रामवाडी मेट्रो स्थानक ते खराडी आयटी पार्क: खराडी परिसरात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेळ वाचवणारा मार्ग.
मगरपट्टा सिटी ते कल्याणीनगर मेट्रो स्थानक: मगरपट्टा परिसरातील प्रवाशांसाठी सुविधा वाढवणारा मार्ग.
advertisement
हिंजवडी–देहू–आळंदी: पाचवा मार्ग, ज्यामुळे शहराच्या बाह्य भागातील प्रवाशांना सुविधा मिळेल.
आता पुणेकरांना येत्या दिवाळीत विशेषतहा सकाळी आणि संध्याकाळी, डबल डेकर बसच्या माध्यमातून सुरक्षित, आरामदायक आणि जलद प्रवासाचा अनुभव घेता येईल. यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होईल आणि आयटी कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक सुधारेल.
शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे. डबल डेकर बस ही फक्त प्रवाशांसाठी नव्हे तर शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठीही मोठा बदल घडवून आणणार आहे. भविष्यात आणखी मार्ग वाढवण्याची शक्यता असून पुणेकरांसाठी हा प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायक होईल
मराठी बातम्या/पुणे/
Pune Double Decker Bus : हिंजवडी-मगरपट्ट्यातील प्रवाशांसाठी गूड न्यूज! PMPMLच्या डबल डेकर बस सुरू; कसा आणि कुठून असेल मार्ग?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement