Gold Silver Rate : नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीही सोन्याची चमक वाढली, प्रति तोळा आजचा दर काय?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Gold Silver Rate : शारदीय नवरात्रौत्सवाचा उत्साह सगळीकडे दिसून येत आहे. सोन्याच्या दराची झळाळी दुसऱ्या दिवशी आणखीच वाढली आहे.
Gold Silver Rate : शारदीय नवरात्रौत्सवाचा उत्साह सगळीकडे दिसून येत आहे. सोन्याच्या दराची झळाळी दुसऱ्या दिवशी आणखीच वाढली आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. सोमवारी, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 11, 258 रुपयांवर पोहोचला होता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलत्या धोरणांमुळे सोन्याच्या भावात गेल्या वर्षभरापासून सातत्याने वाढ होत असताना दिसत आहे. अमेरिकन मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याज दर धोरणाचाही परिणाम सोन्याच्या दरावर दिसून आला आहे. शेअर बाजारात असलेल्या अनिश्चितेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला गुंतवणूकदारांनी पसंती दिली. बाजार काही प्रमाणात स्थिर झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा जोखीम घेत बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मात्र, जागतिक पातळीवरील घडामोडीनंतर पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
advertisement
ऑल इंडिया बुलियन असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, आजच्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट 1,16, 647 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, 23 कॅरेट 1,11, 800 रुपये मोजावे लागणार. चांदीचा दर हा प्रति किलो 1,38,656 रुपये इतका आहे.
सोन्याचा दर काय?
22 कॅरेट- 1,06,934
20 कॅरेट 97,210
18 कॅरेट 87, 495
advertisement
14 कॅरेट 68, 052
या वर्षी अमेरिकन फेडरल रिझर्व्हने आणखी दर कपात करण्याची आशा व्यक्त केली होती, त्यामुळे सोन्याच्या किमती प्रति औंस $3,750 च्या वर गेल्या आणि एक नवीन विक्रम नोंदवला गेला. गेल्या आठवड्यात, फेडने पहिली 25-बेसिस-पॉइंट कपात केली आणि येत्या बैठकांमध्ये जवळजवळ दोन कपातीची शक्यता दर्शविली. त्याचा परिणामही बाजारावर दिसणार आहे.
advertisement
दरम्यान, सोन्याचे दर वाढत असल्याने ग्राहकांकडून काही प्रमाणात वेट अँड वॉच ही भूमिका घेतली जात असली तरी नवरात्र,दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण तोंडावर आल्याने खरेदी टाळणे अनेकांसाठी शक्य नाही. त्यामुळे भाव वाढले तरी ग्राहकांचा ओघ कायम असल्याचे सुवर्ण व्यवसायिकांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 10:27 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Rate : नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीही सोन्याची चमक वाढली, प्रति तोळा आजचा दर काय?