advertisement

Sambhaji Bhide : धारकऱ्याकडे रात्री जेवण केलं, घरी जाताना भिडे गुरुजींसोबत घडला अनर्थ, आता प्रकृती कशी?

Last Updated:

Sambhaji Bhide : सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

News18
News18
असिफ मुरसळ, प्रतिनिधी, सांगली : सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात संभाजी भिडे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घ़डला असल्याचे समोर आले. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले आहे. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका धारकऱ्याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून भिडे गुरुजी आपल्या घरी जात होते. त्याच वेळी भिडे गुरुजींवर कुत्र्यांनी अचानकपणे हल्ला केला. कुत्र्याने भिडे गुरुजींच्या पायाचा चावा घेतला.
advertisement
या घटनेनंतर संभाजी भिडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. कुत्र्याने केलेल्या हल्ल्यानंतर धारकऱ्यांमध्ये चितेंचे वातावरण पसरले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sambhaji Bhide : धारकऱ्याकडे रात्री जेवण केलं, घरी जाताना भिडे गुरुजींसोबत घडला अनर्थ, आता प्रकृती कशी?
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement