मकर संक्रांतीला मामाकडे आला, पतंग उडवताना विद्युत तारेला स्पर्श, मुलाचा जागीच मृत्यू
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
मकर संक्रांतीच्या सणाला पतंग उडवण्यासाठी अर्णव पिंपरी-चिंचवडहून कोपरगावला मामाकडे आला होता. पतंग उडवत असताना एका अपघातामध्ये त्याचा मित्रही जखमी झाला.
सांगली: मकर संक्रांतीच्या सणानिमित्त पतंग उडवण्याची मुलांना भारी हौस वाटते. पक्षीमित्र आणि सामाजिक संस्थांच्या वारंवार जनजागृतीनंतरही मुले पतंग उडवत असतात. यातूनच अनेकदा भयंकर घटना समोर येतात. यापैकीच चौदा वर्षीय अर्णव महेश व्यवहारे मुलाच्या मृत्यूची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. मकर संक्रांतीच्या सणाला पतंग उडवण्यासाठी अर्णव पिंपरी-चिंचवडहून कोपरगावला मामाकडे आला होता. पतंग उडवत असताना एका अपघातामध्ये त्याचा मित्रही जखमी झाला.
दुर्दैवी थरार
पिंपरी चिंचवड येथील अर्णव हा कोपरगावमध्ये लक्ष्मीनगर भागातील त्याचे मामा ओंकार आनंदा काळे यांच्याकडे आला होता. अर्णव गच्चीवर मित्र ऋषिकेश वाघमारे याच्यासोबत पतंग उडवत होता. बायडिंग तारेने हे दोघे पतंग उडवत होते. तेव्हा बायडिंग तारेचा हाय व्होल्टेज विद्युत तारेला स्पर्श झाला. त्यामुळे तीव्र झटक्याने अर्णवचा जागीच मृत्यू झाला. तर तेरा वर्षीय ऋषिकेश वाघमारे याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
संक्रांतीला पतंग उडवण्याच्या उत्साहात वारंवार अशा दुर्दैवी घटना घडत असतात. असे प्रसंग टाळण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 9:57 AM IST
मराठी बातम्या/सांगली/
मकर संक्रांतीला मामाकडे आला, पतंग उडवताना विद्युत तारेला स्पर्श, मुलाचा जागीच मृत्यू










