Satara Crime : साताऱ्यात मुख्याध्यापकाकडून मुलाचा छळ, जातिवाचक शिव्या; ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

Last Updated:

Satara Crime News : शाळेत शिक्षकांना जाब विचारण्यासाठी गेले असता आई-वडिलांना देखील आरोपींनी जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. सातारा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Satara Crime principal of the institution was Arrested under atrocity
Satara Crime principal of the institution was Arrested under atrocity
Satara Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरातील एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूलमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थाचालकासह त्याची पत्नी, मुख्याध्यापक आणि शिक्षकाने एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. संस्थाचालकाची पत्नी, मुख्याध्यापक आणि शिक्षकाने एका विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सर्वांसमोर जातिवाचक शिवीगाळ केली त्यामुळे विद्यार्थी मुलगा आत्महत्येस प्रवृत्त झाला, असा आरोप देखील करण्यात आला आहे. ही घटना 13 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान सातारा परिसरात घडली.

जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण

मुलाला मारहाण केल्यानंतर शाळेत शिक्षकांना जाब विचारण्यासाठी गेले असता आई-वडिलांना देखील आरोपींनी जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात सातारा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींमध्ये संचालक तुकाराम दादाराव मुंडे, आशा तुकाराम मुंडे, मुख्याध्यापक जस्सी जयस्वाल, क्रीडा शिक्षक प्रवीण वाघ याच्यासह एकाचा समावेश आहे. त्यामुळे सध्या साताऱ्यात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
advertisement

एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल

तुकाराम दादाराव मुंडे असं आरोप करण्यात आलेल्या एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थाचालकाचं नाव आहे. त्यासोबत पत्नीने आशाने देखील मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूलचे क्रिडा शिक्षक प्रवीण वाघ यांच्यावर देखील मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara Crime : साताऱ्यात मुख्याध्यापकाकडून मुलाचा छळ, जातिवाचक शिव्या; ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement