Satara Lok Sabha : साताऱ्यात पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग! उदयनराजेंना कोसळलं रडू

Last Updated:

Satara Loksabha Election Result 2024 : शरद पवार यांचा बालेकिल्ला समजल्या सातारा लोकसभा मतदारसंघाला सुरुंग लागला आहे. उदयनराजे भोसले यांनी या ठिकाणाहून विजयी झाले आहेत.

उदयनराजेंना कोसळलं रडू
उदयनराजेंना कोसळलं रडू
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी 1999 पासून ओळख असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाला अखेर सुरुंग लागला आहे. साताऱ्यातून भाजपाकडून उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत पाटील यांच्यात थेट लढत झाली. उदयनराजे भोसले यापूर्वी तीन वेळा राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. पण, मागील पोटनिवडणुकीत त्यांचा श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता. यावेळी उदयनराजे यांनी पराभवाचा वचपा काढला आहे.
विजयानंतर उदयनराजे भावूक झालेले पाहायला मिळाले. त्यांच्या डोळ्यात आनंदअश्रू पाहायला मिळाले.
घड्याळ चिन्ह गायब
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीकडून साताऱ्याची जागा लढवेल असा अंदाज होता. पण, त्यांना प्रबळ उमेदवार मिळाला नाही. उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रयत्न झाला. पण, त्याला उदयनराजेंनी नकार दिला. त्यानंतर भाजपाकडून राजेंना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच पहिल्यांदाच घड्याळ चिन्हशिवाय सातारा लोकसभा निवडणूक लढली गेली.
advertisement
पक्षीय बलाबल
सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Loksabha Election Result 2024) सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये सातारामध्ये भाजपाचे शिवेंद्रराजे भोसले आमदार आहेत. पाटणमध्ये शिवसेनेचे शंभुराज देसाई, कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, कराड उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील, वाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील तर कोरेगावमधून शिवसेनेचे महेश शिंदे आमदार आहेत. सहापैकी चार जागा या महायुतीकडं असून दोन जागांवर महाविकास आघाडीचे आमदार होते.
advertisement
मागील निवडणुकांचे निकाल
उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2009, 2014 आणि 2019 साली झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. 2019 मधील सार्वत्रिक निवडणुकीत उदयनराजे 1 लाख 26 हजार मतांनी विजयी झाले. त्यानंतर त्यांनी काही महिन्यातच भाजपामध्ये प्रवेश केला. ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील 87 हजार मतांनी विजयी झाले होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara Lok Sabha : साताऱ्यात पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग! उदयनराजेंना कोसळलं रडू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement