Satara News : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली; स्टेजवरचं कोसळले अन्..
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Satara News : सातारा येथे शांतता रॅली सुरू असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली.
सातारा, (सचिन जाधव, प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. जरांगे पाटील यांची आज सातारा जिल्ह्यात शांतता रॅली पार पडत आहे. यावेळी व्यासपीठावर असताना अचानकपणे मनोज जरांगे पाटील यांना त्रास जाणवू लागला. डॉक्टरांकडून मनोज जरांगे पाटील यांची तपासणी सुरू आहे.
मनोज जरांगे व्यासपीठावरच बसले
मनोज जरांगे पाटील यांना भाषणानंतर त्रास जाणवू लागला. त्यामुळे ते व्यासपीठावरच खाली बसले. मनोज जरांगे पाटील यांच्या हाताला अचानक कंपण सुरू झाले. घटनेनंतर तात्काळ मराठा बांधवांनी व्यासपीठावर जावुन त्यांना सावरलं. डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली जात आहे. यापूर्वी देखील अनेकदा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
साताऱ्यात शांतता रॅलीला तुफान प्रतिसाद
view commentsमनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज साताऱ्यात दाखल झाली. साताऱ्यातील शिवतीर्थावरून मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सहभागी झाले. ही रॅली गांधी मैदान या परिसरात पोहोचल्यानंतर तिथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर ते खाली बसले.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
August 10, 2024 5:24 PM IST
मराठी बातम्या/सातारा/
Satara News : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली; स्टेजवरचं कोसळले अन्..


